नवाब मलिक यांनी जाहीर केलेला ‘तो’ मोबाइल नंबर कोणाचा? चर्चेला उधाण


हायलाइट्स:

  • नवाब मलिक यांनी घेतली मुंबईत पत्रकार परिषद
  • व्हॉट्सअॅप संभाषण आणि मोबाइल नंबर केला जाहीर
  • तो मोबाइल नंबर कोणाचा?; चर्चेला उधाण

मुंबई: ‘एनसीबीसारखी एक मोठी तपास यंत्रणा ठरवून लोकांना बदनाम करत आहे. हे सगळं केवळ माझ्या जावयापुरतं मर्यादित नाही. अशी डझनभर प्रकरणं आहेत,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज केला. ‘समीर खान यांच्यावरील कारवाईच्या वेळी एनसीबीनं व्हॉट्सअॅपवर काही फोटो व्हायरल केले होते. ज्या नंबरवरून हे फोटो व्हायरल केले गेले, तो नंबरही आज मलिक यांनी जाहीर केला. हा नंबर कोणाचा, यावरून आता तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. (Nawab Malik Shares a Mobile Number)

आठ महिन्यांपूर्वी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणात एनसीबीनं अटक केली होती. तब्बल साडेआठ महिन्यांनंतर त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. समीर खान यांची अटक बेकायदेशीर आणि बोगस होती, असा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी कोर्टाच्या आदेशाचा व खुद्द एनसीबीनं दाखल केलेल्या आरोपपत्राचा हवाला दिला आहे. त्याशिवाय, तपास यंत्रणांकडूनच मीडियाला कशी माहिती पुरवली जाते. खोट्या बातम्या कशा पसरवल्या जातात, हेही त्यांनी सांगितलं.

वाचा: ‘NCB बोगस कारवाया करते, माझ्या जावयालाही खोट्या प्रकरणात अडकवलं’

‘मुंबईत ८ जानेवारी रोजी ९८२०१ ११४०९ या मोबाइल नंबरवरून एक व्हॉट्सअप मेसेज मीडियाला करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशीच्या छाप्याची माहिती आदल्या दिवशीच या मेसेजमधून देण्यात आली होती. त्या संदेशाच्या शेवटी समीर वानखेडे यांचं नाव होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. समीर खान यांच्या घरी गांजा जप्त करण्यात आल्याची माहितीही अशीच पसरवण्यात आली होती. प्रत्यक्षात एनसीबीच्या कारवाईत २०० किलो गांजा सापडलाच नसल्याचं समोर आलं आहे. हे प्रकरण केवळ साडेसात ग्रॅम गांजाचं आहे. हा गांजा शाहिस्ता फर्निचरवाला हिच्याकडं सापडला होता. मात्र, तिला सोडून समीर खान, राहिला फर्निचरवाला आणि करण सजलानी यांना या प्रकरणात गोवण्यात आलं, असा आरोप मलिक यांनी केला.

वाचा: महागाई कमी झाली म्हणे, सगळी गंमतच सुरू आहे: शिवसेना

‘१२ जानेवारी रोजी रात्री १० वाजता समीर खान यांना ईडीचं समन्स आलं आणि १३ तारखेला ते ठरलेल्या वेळेआधी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. याची माहिती माध्यमांना आधीच देण्यात आली होती. ही माहिती देखील याच नंबरवरून देण्यात आली होती. त्यामध्ये समीर खान हे ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याचं माहिती पसरवली जात होती, अशी माहितीही त्यांनी दिली. ‘एनसीबीची पोलखोल सुरू केल्यापासून व काही अधिकाऱ्यांचं भाजपशी कनेक्शन असल्याचं उघड केल्यापासून मला धमक्या येऊ लागल्या आहेत,’ असंही त्यांनी सांगितलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: