शेअर बाजारात दिवाळी; सेन्सेक्स पहिल्यांदाच ६१००० अंकावर, गुंतवणूकदारांची कमाई


हायलाइट्स:

  • आज सेन्सेक्सने पहिल्यांदाच ६१००० अंकाची विक्रमी पातळी गाठली.
  • सेन्सेक्स पहिल्या सत्रात ३०० अंकांनी वधारला आहे.
  • निफ्टीमध्ये देखील ११६ अंकांची वाढ झाली आहे.

मुंबई : भांडवली बाजारात गुंतवणुकीचा ओघ वाढला असून शेअर निर्देशांक दररोज नवनवे उच्चांक गाठला आहे. आज गुरुवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने पहिल्यांदाच ६१००० अंकाची विक्रमी पातळी गाठली. तो ३०० अंकांनी वधारला आहे. निफ्टीमध्ये देखील ११६ अंकांची वाढ झाली असून तो १८२७८ अंकावर गेला आहे.
टाटा मोटर्सचा शेअर सुस्साट! गाठला वर्षभराचा उच्चांक, हे आहे त्यामागचे खरे कारण
आज बाजारात आयटी कंपन्यांच्या शेअरला मोठी मागणी आहे. विप्रो, इन्फोसिस या शेअरमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर टाटा समूहाच्या विविध शेअरमध्ये खरेदी सुरु आहे. आयटी क्षेत्रात टीसीएस वगळता इन्फोसिस, विप्रो आणि माइंडट्री या कंपन्यांची दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आयटी शेअरमध्ये गुंतवणूक वाढवली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सेन्सेक्स ६१०३० अंकावर ट्रेड करत आहे. त्यात २९३ अंकाची वाढ झाली आहे.

निफ्टी मंचावर विप्रोच्या शेअरमध्ये सर्वाधिक ४ टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर अदानी पोर्ट, ग्रासीम, एल अॅंड टी, एसबीआय, इंडियन आॅइल, आयटीसी, एचडीएफसी बँक, हिंदाल्को, श्री सिमेंट हे शेअर तेजीत आहे. तर एचसीएल टेक, टाटा मोटर्स, टीसीएस, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स , एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

तुमच्याकडे आहे का ‘हा’ क्रिप्टो कॉईन; अवघ्या दोन महिन्यात एक हजारचे झाले ३४ लाख!
काल बुधवारी सेन्सेक्स ४५३ अंकांनी वधारून ६०७३७ अंकांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला होता. यात रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा, आयटीसी, इन्फोसिस या शेअरमध्ये वाढ झाली होती.

बातमी अपडेट होतेय…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: