कोविडचे संकट दूर करून राज्याला सुबत्ता देण्याची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची आई महालक्ष्मीला प्रार्थना

पोलीस विभागाने नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवावा
कोल्हापूर,दि.13/10/2021/जिमाका:- नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात पोलीस विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या सुरक्षेची पाहणी केली. पोलीस विभागाने यापुढील काळात ही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी काटेकोरपणे बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार ,पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण,सचिव शिवराज नाईकवाडी व अन्य अधिकारी उपस्थित होते. 

  गृह (ग्रामीण) राज्यमंत्री देसाई यांनी श्री आई महालक्ष्मीचे दर्शनासाठी आवश्यक असलेल्या ई-पाससह अन्य शासकीय नियमांचे पालन करून दर्शन घेतले. मागील दीड-दोन वर्षांपासून राज्यावर व जगावर कोरोनाचे संकट आलेले असून ते संकट दूर करून राज्याची आर्थिक सुबत्तेत वाढ व्हावी. सर्व नागरिक सुखी व समाधानी राहावेत,यासाठी आई महालक्ष्मीकडे प्रार्थना केली.

   प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पश्चिम महाराष्ट्र मंदिर देवस्थान समिती, जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाने श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात मंदिरात सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाय योजनांची माहिती मंत्री महोदयांना दिली. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी दर्शनासाठी ई- पासची व्यवस्था केली आहे. त्या माध्यमातून भाविकांना दर्शनाची निश्चित वेळ दिली जात असल्याने भाविक ही दर्शनासाठी स्लॉट प्रमाणे येत असल्याने याठिकाणी गर्दी कमी प्रमाणात होत असून भाविकांचेही दर्शन कमी वेळेत होत आहे. तसेच कोरोनांच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन या ठिकाणी होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: