हायलाइट्स:
- जिल्हा परिषद सदस्य बजरंग जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश
- उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भगवा घेतला हाती
- लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का
मागील विधानसभा निवडणुकीत औसा मतदारसंघातून बजरंग जाधव यांना उमेदवारी हवी होती. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासूनच बजरंग जाधव भाजपवर नाराज होते, त्यामुळेच त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
बजरंग जाधव यांना शिवसेना उमेदवारी देणार?
औसा मतदारसंघात भाजपसह काँग्रेसची ताकद मोठी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढल्यास या मतदारसंघात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात असल्याने बजरंग जाधव यांना शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळेल.