asaduddin owaisi : ‘एक दिवस हे लोक सावरकरांना राष्ट्रपित्याचा दर्जा देतील’, ओवैसींची बोचरी टीका


हैदराबादः स्वातंत्र्यवीर सावरकरांवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या वक्तव्यावरून एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे. राजनाथ सिंहांनी इतिहासाचं पार वाटोळं केलं आहे. एक दिवस हे लोक सावरकरांना राष्ट्रपिताचाही दर्जा देतील, असं ओवैसी म्हणाले.

काय म्हणाले ओवैसी?

सावरकरांवरील राजनाथ सिंहांच्या वक्तव्यावर असदुद्दीन औवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे लोक इतिहास मोडून-तोडून सांगत आहेत. एक दिवस हे लोक महात्मा गांधीचा राष्ट्रपिताचा दर्जा काढून तो सावरकरांना देतील. न्यायाधीश जीवन लाल कपूर यांच्या तपासात गांधीजींच्या हत्येत सावकर सामील असल्याचं आढळून आलं होत’, असं ओवैसी म्हणाले आहेत.

Veer Savarkar: गांधीजींच्या सल्ल्यानंतरच सावरकरांची इंग्रजांपुढे दया याचिका : राजनाथ सिंह

काय म्हणाले होते राजनाथ सिंह?

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती, अशी टीका विरोधकांकडून केली जाते. मात्र, सावरकरांच्या विरोधात खोट्या गोष्टी पसरवण्यात आल्या. वास्तवात सुटकेसाठी त्यांनी दया याचिका दाखल केलेल्या नव्हत्या. सामान्यत:च एखाद्या कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. मात्र, महात्मा गांधी यांनी सावरकरांना दया याचिका दाखल करण्याचा सल्ला दिल्यानंतरच सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती. ‘ज्या प्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत, सावरकर तेच करतील’ अशी गांधींनी म्हटल्याचंही राजनाथ सिंह म्हणाले.

mohan bhagwat : ‘सावरकरांच्या बदनामीसाठी मोहीम राबवली गेली’, मोहन भागवतांचा गंभीर आरोपSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: