सोनं तेजी कायम ; सलग दुसऱ्या सत्रात महागले सोने, जाणून घ्या आजचा दर


हायलाइट्स:

  • उत्सव काळात सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे.
  • सलग दुसऱ्या सत्रात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली.
  • सोने तब्बल ६०० रुपयांनी तर चांदी ११०० रुपयांनी महागली.

मुंबई : उत्सव काळात सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. आज बुधवारी सराफा बाजारात सोने २५० रुपयांनी महागले. चांदीमध्ये ३५० रुपयांची वाढ झाली. सलग दुसऱ्या सत्रात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली. कमॉडिटी बाजारात सोने तब्बल ६०० रुपयांनी तर चांदी ११०० रुपयांनी महागली.

तुमच्याकडे आहे का ‘हा’ क्रिप्टो कॉईन; अवघ्या दोन महिन्यात एक हजारचे झाले ३४ लाख!
कमॉडिटी बाजारात मंगळवारी सकाळच्या सत्रात सोने २४० रुपयांनी तर चांदीमध्ये ३०० रुपयांनी महागले होते. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७८२८ रुपये आहे. त्यात ६३० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या एक किलो चांदीचा भाव ६२७४० रुपये आहे. त्यात ११५४ रुपयांची वाढ झाली आहे. त्याआधी चांदीचा भाव ६२८९८ रुपयांपर्यंत वाढला होता.

महिलांची कमाई त्यांच्या पतीपेक्षा कमी का? अभ्यासातून समोर आली नवी माहिती
Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६२९० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४७२९० रुपये आता वाढला. त्यात २६० रुपयांची वाढ झाली. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६३०० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०५१० रुपये झाला आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४४४० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८४८० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६७०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९४०० रुपये इतका वाढला आहे.

देशात कोळसा संकट; मुकेश अंबानींचा मोठा डाव,३ दिवसांत ४ विदेशी कंपन्यांवर मिळवला ताबा
गेल्या वर्षी करोन संकटाने सोने आणि चांदीमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढला होता. या काळात सोन्याचा प्रती भाव ५६२०० रुपयांवर गेला होता. सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते. जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव १७६८ डॉलरच्या आसपास आहे. चांदीचा भाव प्रती औंस २२.८० डॉलर आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: