आमचे गुरुजी दुसर्या शाळेवर गेले,मुलांसह गुरुजी, पालकांचेही अश्रु अनावर
शेळवे/संभाजी वाघुले- शेळवे ता.पंढरपूर येथील जि.प.प्राथ. शाळेतील शिक्षक राजकुमार अष्टपुञे यांची बदली झाल्याचे कळताच मुलांसह पालकातूंनही हळहळ व्यक्त होत आहे .
अष्टपुञे गुरुजी शेळवे शाळेत आल्यापासून गुरुजी, मुलांचे आणि पालकांचे भावनिक नाते निर्माण झाले होते .कोणतीही गोष्ट असो प्रत्येक गोष्ट गुरुजी आपलेपणाने करत असत.मुलांना कधीच रागावत नसत.अतिशय प्रेमाने मुलांना समजावून सांगत असत,त्याचप्रमाणे पालकांनाच नव्हेतर कुणालाही कसलीही अडचण आल्यास सोडवण्यासाठी मदत करणारे अष्टपुञे गुरुजी असत.अष्टपुञे गुरुजी ज्या ज्या शाळेत गेले त्या त्या शाळेत गुरूजी बनून तर राहिलेच परंतु आपला माणूस म्हणून ते ओळखले जाऊ लागले.
१२ आक्टो.रोजी शेळवे जि.प.प्राथ.शाळा शेळवे येथे राजकुमार अष्टपुञे गुरुजी यांचा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी शंकर गाजरे,बाळासाहेब काळे,शांताराम गाजरे,मोहन गाजरे, बाळासाहेब गाजरे,संभाजी वाघुले,शुभांगी माळी आणि समाधान बैले आदी उपस्थित होते.

माझी जन्मभुमी व कर्मभुमी एकच आहे.मी कुठेही गेलो तरी या शाळेला येथील आपल्या माणसांना सदैव मदत करीत राहीन असे म्हणत राजकुमार अष्टपुञे गुरुजींना अश्रु अनावर झाले.