रंगून: म्यानमारमधील सागाईंग भागामध्ये
म्यानमार लष्कर आणि बंडखोरांच्या गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला. या हिंसक संघर्षात लष्कराचे किमान ३० जवान ठार झाले. पीपल्स डिफेन्स फोर्सने (पीडीएफ) केलेल्या दाव्यानुसार, या संघर्षात एक लष्करी कमांडरसह कमीत कमी ३० सैनिक ठार झाले आहेत.
रेडिओ फ्री आशियाने पीडीएफ सदस्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, जुंटा सैनिकांना सागाईंग भागामध्ये शोध मोहीम सुरू केली होती. सोमवारी सकाळी लष्करी ताफ्यावर पेल टाउनशिपबाहेर भुसुरुंगाद्वारे हल्ला केला. यामध्ये एका कमांडरसह कमीत कमी ३० सैनिक ठार झालेत.
म्यानमारच्या लष्कराने एक फेब्रुवारी रोजी सत्ता ताब्यात घेतली होती. त्यानंतर लोकशाहीवादी नागरिक, संघटना, राजकीय पक्ष आणि लष्करामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. म्यानमारच्या लष्कराने सत्ता हाती घेतल्यानंतर एक वर्षासाठी आणीबाणी लागू करण्यात आली.
म्यानमार: बंडखोरांचा सैनिकांवर भीषण हल्ला; ४० ठार, ३० जखमी
असिस्टेंस एसोसिएशन फॉर पॉलिटिकल प्रिजनर्सच्या (AAPP) आकडेवारीनुसार, लष्कराने सत्ता उलथवल्यानंतर आठ महिन्यांच्या कालावधीत लष्कराने किमान ७२१९ जणांना अटक केली आहे. तर, आंदोलने, निदर्शनात लष्कराच्या कारवाईत ११६७ जणांचा मृत्यू झाला आहे. म्यानमारचे लष्कर आणि विद्रोही गट यांच्यातील संघर्ष वाढत असून चकमकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
Source link
Like this:
Like Loading...