मनसेच्यावतीने जागरण गोंधळ आंदोलन
औरंगाबाद – मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे , मात्र राज्य सरकार घरात बसून आहे .सरकारला जागे करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मंगळवारी १२ ऑक्टोबर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले , अशी माहिती मनसेचे नेते शँडो सहकारमंत्री दिलीप धोत्रे यांनी सांगितले . ते म्हणाले , पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे सरकारने संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी, ज्यांची गुरे मेली किंवा वाहून गेली आहेत त्यांना ५० हजार मदत करावी, ज्या शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांना डागडुजीसाठी तत्काळ मदत करावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे .
यापुढे होणाऱ्या पंचायत समिती आणि महानगर पालिका निवडणुकीत सर्व जागा लढवणार असून त्याची तयारी सुरू केल्याचे दिलीप धोत्रे यांनी सांगितले . या वेळी मनसे सरचिटणीस संतोष नागरगोजे , प्रवक्ते प्रकाश महाजन राज्य उपाध्यक्ष सुमीत खांबेकर अशोक जावरे,जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे,दिलीप बनकर,शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, बिपिन नाईक ,आशिष सुरडकर,गजानन गौडा पाटील,संकेत शेटे, वैभव मिटकर,संदीप कुलकर्णी,अशोक पवार ,राजू जावळीकर,मंगेश साळवे आदींची उपस्थिती होती .