हायलाइट्स:
- १९७३ ते २०१६ दरम्यान ४५ देशांमध्ये उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
- ही आकडेवारी सुमारे ३० लाख घरांतून घेण्यात आली आहे. या सर्वेक्षणात सहभागी लोकांचे वय १८ ते ६५ वर्षे दरम्यान आहे.
- पुरुष आणि स्त्रियांच्या कमाईमध्ये खूप फरक आहे.
टाटा मोटर्सचा शेअर सुस्साट! गाठला वर्षभराचा उच्चांक, हे आहे त्यामागचे खरे कारण
या सर्वेक्षणाला ‘वेतनातबाबत आंतर घरगुती लिंग असमानतेचे पहिले जागतिक सर्वेक्षण’ असे नाव देण्यात आले आहे. या अभ्यासावर संशोधन करणारे प्राध्यापक हेमा स्वामीनाथन आणि प्राध्यापक दीपक मालघन यांनी सांगितले की, ही आकडेवारी सुमारे ३० लाख घरांतून घेण्यात आली आहे. या सर्वेक्षणात सहभागी लोकांचे वय १८ ते ६५ वर्षे दरम्यान आहे. ही आकडेवारी लक्झमबर्ग इन्कम स्टडी या संस्थेने उचलली आहे. सांख्यिकीवर संशोधन करणारे प्राध्यापक हे बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सेंटर फॉर पब्लिक पॉलिसीमध्ये प्राध्यापक आहेत.
देशात कोळसा संकट; मुकेश अंबानींचा मोठा डाव,३ दिवसांत ४ विदेशी कंपन्यांवर मिळवला ताबा
महसूल वाटप
प्राध्यापक स्वामीनाथन यांनी या अहवालाबद्दल सांगितले की, “परंपरेनुसार, एका घराकडे एक युनिट म्हणून बघून गरिबीचा अंदाज लावला जाऊ शकतो. एका घरात, जर बरेच लोक नोकरी किंवा व्यवसाय करतात, तर ते उत्पन्न आपसात विभागले जाते आणि सर्व लोकांमध्ये संसाधनांचे योग्य वितरण होते. कधीकधी एखादं घर हे असमानतेचे एक मोठे उदाहरण असते आणि आम्हाला या गोष्टी दूर करायच्या आहेत.”
सोने महागले ; आज कमॉडिटी बाजारात झाली मोठी वाढ , चांदीपण वधारली
कोणत्या देशात स्थिती चांगली?
या अहवालात असे म्हटले आहे की, घराचा ब्लॅक बॉक्स म्हणून वापर केला जाऊ शकतो. याचे कारण म्हणजे घराच्या आतली स्थिती समजून घेण्यासाठी डोकावण्याची गरज नाही. प्राध्यापक स्वामीनाथन आणि मालघन म्हणाले की, “जर आपण डेन्मार्क, फिनलँड, आईसलँड, नॉर्वे आणि स्वीडन यांसारख्या देशांबद्दल बोललो, तर तिथे कमाईच्या बाबतीत लिंग समानतेची स्थिती खूप चांगली आहे.”
एखाद्या घरात काम आणि मालमत्तेच्या विभाजनाच्या बाबतीत परिस्थिती वेगवेगळी आहे. संशोधनात, देशांना एकूण विषमता आणि घरगुती असमानतेनुसार क्रमवारी लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जर आपण आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या २०१८च्या अहवाल पाहिला, तर जगभरातील महिला त्यांच्या कामकाजाच्या ७६.२ टक्के वेळ हा देखभाल (विना वेतन) कामावर घालवतात. ही वेळ पुरुषांच्या ३ पट जास्त आहे. आशिया खंडात हा आकडा ८० टक्क्यांच्या जवळपास जातो.
स्त्रियांच्या कमी उत्पन्नाचा परिणाम
प्राध्यापक स्वामिनाथन म्हणाले की, “स्त्रीचे तिच्या घरातील योगदान अतुलनीय आहे, जर एखादा पुरुष काही रोख रक्कम कमावत असेल, तर ते दृश्यमान उत्पन्न आहे. जर एखादी महिला पगार घेत असेल, तर तिला तिच्या कुटुंबातही थोडे अधिक मूल्य मिळते. यासह तिला तिचे मत व्यक्त करण्याचा आणि तिच्या घरातील निर्णयांमध्ये सामील होण्याचा अधिकार मिळतो. जर एखाद्या महिलेचे उत्पन्न वाढले, तर तिला सौदेबाजी करण्याची शक्ती मिळते, त्यात ती यशस्वीही होऊ शकते. एखाद्या महिलेच्या उत्पन्नामुळे साहजिकच तिला घरात अपमानास्पद वागणूक मिळणे कमी होते.