हायलाइट्स:
- रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या ३ दिवसात कंपनीने ४ परदेशी कंपन्यांशी करार केला आहे.
- रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड द्वारे जर्मन कंपनी नेक्सवेफ मध्ये गुंतवणूक केली आहे.
- डेन्मार्कची कंपनी स्टिस्डल (Stiesdal) सोबत करार केला आहे.
झाले मोकळे आकाश! देशांतर्गत विमान सेवेबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
रिलायन्स इंडस्ट्रीजने सांगितले की, त्यांनी सीरिज सी फायनान्सिंगद्वारे नेक्सवेफमध्ये २५ दशलक्ष युरोची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे रिलायन्स नेक्सवेफ कंपनीमध्ये एक धोरणात्मक आघाडी गुंतवणूकदार बनली आहे. ही जर्मन कंपनी मोनोक्रिस्टलाइन सिलिकॉन वेफर्स विकसित आणि निर्मिती करते. त्याला ग्रीन सोलर वेफर्स असेही म्हणतात, जे किफायतशीर आहे. या कराराची प्रक्रिया या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सोने महागले ; आज कमॉडिटी बाजारात झाली मोठी वाढ , चांदीपण वधारली
३ दिवसात ४ करार
रिलायन्सने असेही म्हटले आहे की, त्यांची उपकंपनी असलेल्या रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (RNESL) ने डॅनिश कंपनी स्टिस्डल (Stiesdal A/S) सोबत करार केला आहे. त्यांचा उद्देश भारतात हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर्स तयार करणे हा आहे. स्टिस्डल सध्या ते विकसित करत आहे. करारानुसार, स्टिस्डल हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर्सशी संबंधित तंत्रज्ञानाला रिलायन्स (RNESL) ला परवाना देईल. अंबानींनी पुढील तीन वर्षांत नवीन स्वच्छ ऊर्जा (New Clean Energy) व्यवसायात ७५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. रिलायन्सने २०३५ पर्यंत निव्वळ कार्बन न्यूट्रल बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
बिटकॉइन वधारला, डोजेकॉइनमध्ये घसरण ; जाणून घ्या क्रिप्टो करन्सीचे आजचे भाव
दरम्यान, रविवारी रिलायन्सने क्लिन एनर्जी क्षेत्रातील दोन कंपन्यांचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली होती. कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी सौर पॅनेल निर्माता REC Solar Holdings AS (REC Group) मधील १०० टक्के हिस्सेदारी चीन नॅशनल ब्लूस्टार (ग्रुप) कंपनीकडून खरेदी केली आहे. तसेच कंपनीने स्टर्लिंग अँड विल्सन पॉवरमधील ४० टक्के हिस्सा विकत घेण्याची घोषणा केली. ही कंपनी सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम संबंधी कार्य करते.