भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी आली प्रसिद्ध जाहिरात;’मौका-मौका’चा प्रोमो रिलीज


नवी दिल्ली: येत्या १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये टी-२० वर्ल्डकपला सुरूवात होणार आहे. भारताची पहिली लढत पाकिस्तानविरुद्ध २४ ऑक्टोबर रोजी होईल. या लढतीची प्रतिक्षा सर्व चाहत्यांना आहे. दोन्ही देशात द्विपक्षीय क्रिकेट बंद असल्याने चाहत्यांना या लढतीची फार उत्सुकता आहे. भारत-पाक लढतीसोबतच चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती मौका-मौका या जाहिरातीची.

वाचा- भारतीय क्रिकेटपटूला पुढील आदेश मिळेपर्यंत UAE न सोडण्याचे आदेश; जाणून घ्या कारण

स्टार स्पोर्ट्सने मौका-मौका या जाहिरातीचा प्रोमो रिलीज केला आहे. यासंदर्भात स्टार स्पोर्ट्सने एक ट्वीट केले आहे. तुम्हाला माहितीच आहे की भारत पाकिस्तान लढत आता फार लांब नाही. तुम्ही ही लढत पाहण्यास तयार असालच पण त्याच बरोबर तुम्हाला जाहिरातीबाबत उत्सुकता असेल, असे स्टारने म्हटले आहे.

वाचा- टी-२० वर्ल्डकपमधील भारताची मॅच रद्द; जाणून घ्या वेळापत्रकातील नवे बदल

सर्वात प्रथम २०१५ साली झालेल्या वनडे वर्ल्डकप दरम्यान मौका-मौका जाहिरात चर्चेत आली होती. तेव्हा भारत आणि पाकिस्तान लढतीच्या आधी स्टार स्पोर्ट्सने ही जाहिरात केली होती.

वाचा- IPL फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध कोण लढणार? आज होणार फैसला

त्यानंतर २०१९च्या वर्ल्डकपवेळी देखील पुन्हा एकदा मौकाची जाहिरात चर्चेत आली होती.

वनडे आणि टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी आतापर्यंत १२ लढती खेळल्या आहेत. यासर्व लढतीत भारतीय संघाने विजय मिळवला आहे. या वर्षी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यांची लढत २४ ऑक्टोबर रोजी होईल. दोन्ही संघ एकाच गटात असल्याने स्पर्धेत एक पेक्षा अधिक लढती होण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: