केंद्राची ऑफर नाकारण्याइतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीतः चंद्रकांत पाटील


हायलाइट्स:

  • चंद्रकांत पाटलांचे खळबळजनक विधान
  • शरद पवारांबाबत दिली प्रतिक्रिया
  • महाविकास आघाडीवर चंद्रकांत पाटलांचा निशाणा

नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pwar) यांना केंद्राने तुम्ही आमच्याबरोबर सरकार बनवा अशी ऑफर दिली होती ती न स्विकारण्याइतके शरद पवार कच्चा गुरुचे चेले नाहीत, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी केलं आहे.

शरद पवार यांना केंद्र सरकारने सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली होती, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात येत होता. राष्ट्रवादीच्या या दाव्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीकादेखील केली आहे. चंद्रकांत पाटील हे आज नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

वाचाः मुंबईत जळीतकांड; पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या २० दुचाकी जळून खाक

त्यांचे नाचता येईना अंगण वाकडे असं सध्या चालू आहे. तुम्ही शरद पवारांना केंद्राने तुम्ही आमच्याबरोबर सरकार बनवा अशी ऑफर दिली होती तर न स्विकारण्याइतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. केंद्रामध्ये सरकार असणाऱ्या पक्षासोबत महाराष्ट्रामध्ये सरकार आणण्याला त्यांनी प्राधान्य दिले असते. त्यामुळे आता सर्वसामान्य माणसांना हे काय म्हणतात आणि त्याचा काय अर्थ होतो हे नीट कळतं, असं चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे.

वाचाः पुणेः लेफ्टनंट कर्नल महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

तसंच, राज्यात निर्माण झालेल्या कोळसा टंचाईवरुन देखील चंद्रकांत पाटलांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काहीही झालं केंद्रावर खापर फोडण्याची त्यांची सवय आहे. केंद्राने कोळसा दिला नाही म्हणून वीज कमी निर्माण होणार असे म्हणत आहेत. पण हे सांगणार नाही की, केंद्राने आग्रह धरला होता की पावसामुळं कोळसा कमी मिळेल. वेळीच साठा करा पण तो आम्ही केला नाही हे सरकार सांगणार नाही, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

वाचाः ‘त्या तक्रारींचे पुढे काय झालं’?; राष्ट्रवादीची सोमय्यांविरोधात बॅनरबाजीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: