टी-२० वर्ल्डकपमधील भारताची मॅच रद्द; जाणून घ्या वेळापत्रकातील नवे बदल


नवी दिल्ली: आयसीसी टी-२० वर्ल्डकप (ICC T20 World Cup 2021)ची सुरूवात १७ ऑक्टोबरपासून होणार आहे. सुरुवातीच्या लढती या पात्रता फेरीच्या असतील. त्यानंतर मुख्य स्पर्धेला सुरुवात होईल. या काळात मुख्य फेरीत पात्र ठरलेले संघ सराव सामने खेळणार आहेत. भारतीय संघ देखील दोन सराव सामने खेळणार आहे. पण आता त्यातील पहिला सराव सामना रद्द (India vs England Practice Match Cancelled) झाला आहे.

वाचा- भारतीय क्रिकेटपटूला पुढील आदेश मिळेपर्यंत UAE न सोडण्याचे आदेश; जाणून घ्या कारण

मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्याआधी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार होता. यातील पहिली लढत १८ ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध होणार होती. तर दुसरी लढत २० ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. आता मात्र भारताच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. टीम इंडियाची पहिली सराव लढत रद्द करण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार टीम इंडिया पहिली सराव लढत १८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर २० ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढत दुबईमध्ये होईल. भारताच्या सराव सामन्यातील लढतीचे मैदान देखील बदलण्यात आले आहे. या दोन्ही लढती दुबईच्या आयसीसी अकादमीच्या मैदानावर होतील. आधी या लढती दुबई आंतरारष्ट्रीय मैदानावर होणार होत्या.

वाचा- IPL फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध कोण लढणार? आज होणार फैसला

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची पहिली लढत २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. वर्ल्डकपमध्ये भारताचे पाकिस्तानविरुद्ध शानदार रेकॉर्ड आहे. भारताने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या आतापर्यंतच्या सर्व लढती जिंकल्या आहेत.

टी-२० वर्ल्डकपमधील भारताचे वेळापत्रक

>> भारत विरुद्ध पाकिस्तान- २४ ऑक्टोबर, संध्याकाळी ६ वाजता, दुबई
>> भारत विरुद्ध न्यूझीलंड, ३१ ऑक्टोबर ,संध्याकाळी ६ वाजता, दुबई
>> भारत विरुद्ध अफगाणिस्तान, ३ नोव्हेंबर, संध्याकाळी ६ वाजता, अबुधाबी
>> भारत विरुद्ध बी १, ५ नोव्हेंबर,संध्याकाळी ६ वाजता, दुबई
>> भारत विरुद्ध ए २, ८ नोव्हेंबर, संध्याकाळी ६ वाजता, शारजाह



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: