Veer Savarkar: गांधीजींच्या सल्ल्यानंतरच सावरकरांची इंग्रजांपुढे दया याचिका : राजनाथ सिंह


हायलाइट्स:

  • ‘वीर सावरकरत हू कूड हॅव प्रीव्हेन्टेड पार्टिशन’ पुस्तक प्रकाशन सोहळा
  • सरसंघचालक मोहन भागवतही उपस्थित
  • ‘स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच वीर सावरकरांना बदनाम करण्याची मोहीम सुरू झाली’

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य करताना एक मोठा दावा केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरूनच इंग्रजांपुढे दया याचिका दाखल केली होती, असा दावा राजनाथ सिंह यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केला.

उदय माहूरकर आणि चिरायु पंडित लिखित ‘वीर सावरकरत हू कूड हॅव प्रीव्हेन्टेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित झाले होते. याच कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनीही हजेरी लावली.

एका वेगळ्या विचारधारेनं प्रभावित गट वीर सावरकर यांच्या आयुष्य आणि विचारधारेशी अपरिचित आहे. त्यांना याची योग्य समज नाही आणि त्यामुळेच ते प्रश्न विचारत राहतात. विचारधारेच्या चष्म्यातून पाहिलं तर वीर सावरकर यांच्या योगदानाची उपेक्षा करणं आणि त्यांना अपमानित करणं क्षमा योग्य आणि न्यायसंगत नाही, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलंय.

विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती, अशी टीका विरोधकांकडून केली जाते. मात्र, सावरकरांच्या विरोधात खोट्या गोष्टी पसरवण्यात आल्या. वास्तवात सुटकेसाठी त्यांनी दया याचिका दाखल केलेल्या नव्हत्या. सामान्यत:च एखाद्या कैद्याला दया याचिका दाखल करण्याचाअधिकार असतो. मात्र, महात्मा गांधी यांनी सावरकरांना दया याचिका दाखल करण्याचा सल्ला दिल्यानंतरच सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती. ‘ज्या प्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत, सावरकर तेच करतील’ अशी गांधींनी म्हटल्याचंही राजनाथ सिंह म्हणाले.

mohan bhagwat : ‘सावरकरांच्या बदनामीसाठी मोहीम राबवली गेली’, मोहन भागवतांचा गंभीर आरोप
Manoj Tiwari: छटपूजेसाठी स्टंटबाजी महागात, भाजप खासदार मनोज तिवारी रुग्णालयात दाखल

आपल्या राष्ट्रीय नायकांच्या व्यक्तीत्व आणि कृतित्वाबद्दल वाद – प्रतिवाद असू शकतात, परंतु त्यांना पाण्यात पाहणं कोणत्याही पद्धतीनं योग्य आणि न्यायसंगत ठरवलं जाऊ शकत नाही. वीर सावरकर हे महान स्वातंत्र्यसेनानी होते आणि भविष्यातही राहतील. इंग्रजांनी त्यांना दोन वेळी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, यातूनच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्यांची इच्छाशक्ती किती मजबूत होती याचा अंदाज येऊ शकतो. काही विशिष्ट विचारधारेनं प्रभावित लोक अशा राष्ट्रवादावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न करतात, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

सावरकरांवर नाझीवादी, फॅसिस्टवादी असल्याचा आरोप करणारे लोकच लेनिनवादी, मार्क्सवादी विचारांनी प्रभावित होते आणि आजही आहेत, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलंय.

हिंदुत्वाबद्दल सावरकरांचे विचार भारताच्या भौगोलिक स्थिती आणि संस्कृतीशी निगडीत होते. त्यांच्यासाठी हिंदू हा शब्द एखाद्या विशिष्ट धर्म, पंथाशी निगडीत नव्हता तर भारताच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक ओळखीशी जोडलेला होता, असा दावाही संरक्षणमंत्र्यांनी केलाय.

याच कार्यक्रमात, ‘स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच वीर सावरकरांना बदनाम करण्याची मोहीम सुरू झाली होती. सावरकरांची ठरवून बदनामी केली गेली. कारण खरं लक्ष्य होतं भारताचा राष्ट्रवाद… स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आजच्या काळात देशात योग्य माहितीचा मोठा अभाव आहे. ही एक समस्या आहे’, असं वक्तव्य सरसंघचालक यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं.

Corona Death: करोना मृतांच्या कुटुंबाला ५० हजारांची मदत, पंजाब सरकारची घोषणा
देशात निर्णय घेणारे सरकार, पंतप्रधान मोदींनी स्वत:चीच पाठ थोपटली



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: