शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले हे शिवप्रेमींचे प्रेरणास्थान आहेत. अशा पवित्र किल्ल्यांची नावे काही बार आणि वाइन शॉप ला दिलेली आहेत. उदाहरणार्थ प्रतापगड बार, शिवनेरी वाईन शॉप, राजगड परमिट रूम बियर बार अशी अनेक नावे पहायला मिळतात. गड किल्ले हे आपल्या लढण्यासाठी स्फूर्ती देतात अशा गड किल्ल्यांची नावे ज्या ज्या बार आणि वाईन शॉप ला दिलेली आहेत, ती त्वरित बदलण्याची व यापुढे अशी नावे असलेल्या बार आणि परमिट रूम वाईन शॉप यांना परवानगी देऊ नये असा निर्णय शासनस्तरावर व्हावा अशी मागणी राज्यमंत्री देसाई यांच्याकडे करण्यात आली.
क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज नव्या रुग्णांची संख्या पुन्हा २ हजारांवर; मृत्यूही वाढले
सर्व गड-किल्ल्यांवर शासनामार्फत दारूबंदी झाली आहे पण कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गडावर बियर बार आणि देशी दारूचे दुकान सुरू आहे ते ताबडतोब बंद व्हावे, दारूबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याबाबत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन उभारावे लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. लवकरच याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक मुंबई येथे लावण्यात येईल अशी ग्वाही दिली मंत्री देसाई यांनी दिली.
क्लिक करा आणि वाचा- शिवसेनेचा दसरा मेळावा; रामदास कदम यांना बोलावलं असेल का?, रंगली चर्चा
मंत्री देसाई यांना भेटलेल्या शिष्टमंडळात हर्षल सुर्वे, इंद्रजीत सावंत, किरण सिंह चव्हाण, प्रदीप पांडे, विजय दरवान, अर्जुन संकपाळ, विक्रम जगताप, केतन पाटील, अमृता सावेकर, शुभम जाधव, गणेश खोचीकर, प्रिया पाटील, रोहित पानारी यांचा समावेश होता.
क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! फक्त तीस हजार रुपयांसाठी महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न