नवी दिल्लीः कोळशाचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे (
power crisis ) केल्या आहेत. यावर कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रतिक्रिया (
coal minister pralhad joshi ) दिली आहे. अधिक पाऊस हे यामागचं एक कारण आहे. अतिवृष्टीमुळे कोळशाचा पुरवठा आणि उत्पादनात काहिशी घट झाली आहे. दुसरे, मोठं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचे वाढलेले दर. यामुळे कोळसा आयात महाग झाली आहे, असं कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले.
मला कोणतेही आरोप करायचे नाहीत. पण आम्ही राज्यांना जानेवारी ते जुलैपर्यंत आमच्याकडून कोळसा घेऊन साठा वाढवण्याची सूचना केली होती. कारण जोरदार पाऊस पडल्यावर अडचणी येऊ शकतात. पण आम्ही केलेल्या सूचनेनुसार राज्यांनी तसे केले नाही. राज्यांना लगेचच पैसे द्यावे लागत नाहीत. कोळसा क्रेडिटवर उपलब्ध केला जातो. राज्यांना कोळशाचा रोज होत असलेला पुरवठा सुरू राहील. तसंच पुढील १५-२० दिवसांत साठा वाढण्यास सुरवात होईल. अनेक राज्यांमध्ये कोळसा खाणी आहेत. पण त्यांनी त्याचा वापर केला नाही, असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले.
आयात करण्यात येत असलेल्या कोळशाची किंमत आधी सुमारे ६० डॉलर प्रति टन होती. आता ती वाढून १९० ते २०० डॉलर प्रति टन झाली आहे. आयात केलेल्या कोळशाद्वारे देशातील वीजनिर्मिती केंद्रांद्वारे ३० ते ३५ टक्के वीज उत्पादन केलं जातं. पण सध्या ही वीजनिर्मिती बंद आहे. आम्ही दोन दिवसांसाठी १९ लाख टनांहून अधिक कोळशाचा पुरवठा दिला आहे. हा कोळसा मागणीपेक्षा जास्त आहे. २१ ऑक्टोबरपासून २० लाख टनांची मागणी केली गेली आहे. ती मागणी पूर्ण केली जाईल आणि कोळशाचा तेवढा पुरवठा करण्यात येईल, असं ते म्हणाले. एबीपी न्यूज ने वृत्त दिलं आहे.
Coal and Power Crisis: कोळसा संकटात देशवासियांच्या मदतीला रेल्वे धावली!
आम्ही सोमवारी १.९४ दशलक्ष टन कोळसा पुरवठा केला आहे. आतापर्यंतच्या घरगुती कोळशाचा हा सर्वाधिक पुरवठा आहे. आधी १५-२० दिवसांपूर्वी कोळशाचा साठा कमी झाला होता. पण सोमवारी कोळशाचा साठा वाढला आहे. कोळशाचा साठा आणखी वाढेल आणि घाबरण्याची कुठलीही परिस्थिती नाही, असा विश्वास कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिला.
power crisis : देशात वीज संकट? अमित शहांची ऊर्जा आणि कोळसा मंत्र्यांसोबत बैठक
Source link
Like this:
Like Loading...