नवी दिल्लीः अमित खरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमित खरे हे १९८५ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ही नियुक्ती करारावर केली जाते. अमित खरे हे ३० सप्टेंबरला सचिव (उच्च शिक्षण) पदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या कार्यकाळात केंद्रीय मंत्रिमंडळाने देशाचे नवीन ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ ला मंजुरी दिली होती.
अमित खरे यांनी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आपले कौशल्य आणि विविध क्षेत्रातील व्यापक अनुभवाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. केंद्राच्या त्यांनी उज्ज्वला योजनेतही योगदान दिले. त्यांनी डिसेंबर २०१९ मध्ये शिक्षण मंत्रालयात उच्च शिक्षण विभागात सचिव म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर पुढील काही महिन्यांत ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ ला २९ जुलै २०२० ला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.
कोळसा मंत्र्यांनी दिले उत्तर; म्हणाले, ‘…. पण राज्यांनी तसं केलं नाही’
चारा घोटाळा उघड झाला
अमित खरे यांनी चारा घाटोळा उघड केला होता. या चारा घोटाळ्यात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री लालू यादव यांना तुरुंगात जावे लागले. चाईबासाचे उपायुक्त असताना त्यांनी चारा घोटाळाप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. यानंतर हे प्रकरण प्रकाशझोतात आले होते.
Coal and Power Crisis: कोळसा संकटात देशवासियांच्या मदतीला रेल्वे धावली!
Source link
Like this:
Like Loading...