bjp slams congress : भाजपचा राहुल, प्रियांका गांधींवर घणाघात, ‘राजस्थानमधील दलितांना मानवाधिकार नाहीत का?’


नवी दिल्लीः भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला आहे. उत्तर प्रदेशात कोणत्या प्रकारचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे जनता बघतेय. लखीमपूर खिरीमध्ये जे घडले ते पूर्णपणे दुःखद आहे आणि त्या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी सुरू आहे. काही राजकीय पक्ष ज्या प्रकारचे मतांसाठी राजकारण करत आहेत, हे दुःखद आहे. विशेषत: गांधी कुटुंब, प्रियांका आणि राहुल गांधी हे स्वतःला चॅम्पियन ऑफ दलित दलित राइट्स म्हणून दाखवत आहेत, अशी टीका संबित पात्रा यांनी केली.

‘राहुल-प्रियांका राजस्थानला का गेल्या नाहीत’

मानवाधिकारांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन तेव्हा होते, जेव्हा त्याला राजकीय रंग दिला जातो आणि राजकीय दृष्टीकोनातून बघितले जाते. राजकीय नफा -तोट्याच्या तराजूने तोलले जाते. आशा प्रकारचे ठराविक वर्तन लोकशाहीला तितकेच हानिकारक आहे, असं असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटल्याचं पात्रा यांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी राजस्थानातील प्रेमपुरा गावात एका तरुणाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या घरासमोर फेकून देण्यात आला. पण राहुल गांधी, प्रियांका वाड्रा, अखिलेश यादव किंवा बंगालमधील कोणताही नेता तिथे पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी गेला नाही, असं हल्ला पात्रा यांनी विरोधकांनी चढवला.

राजस्थानच्या दलितांना मानवी हक्क नाहीत का?

राजस्थानचे प्रशासन तेथील दलितांवर होणाऱ्या अन्यायावर कोणतीही कारवाई करत नाहीए. मग राजस्थानच्या दलितांना मानवी हक्क नाहीत का? राजस्थानच्या प्रकरणावर काँग्रेस, राहुल आणि प्रियांका गांधींचे मौन का? असा सवाल संबित पात्रा यांनी केला.

Electoral Bonds: निवडणूक बाँडमधून शिवसेनेला १११ कोटी

दरम्यान, लखीमपूर हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या ‘अंतिम अरदास’ साठी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी या यूपीत दाखल झाल्या आहेत. दुसरीकडे, लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पक्षाचं एक शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.

देशात निर्णय घेणारे सरकार, पंतप्रधान मोदींनी स्वत:चीच पाठ थोपटलीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: