Terrorist Arrest: राजधानी दिल्लीत एके ४७, ग्रेनेडसहीत एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक


हायलाइट्स:

  • दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून कारवाई
  • दहशतवादाचा मोठा कट उधळला
  • पाकिस्तानी नागरिक असलेला मोहम्मद अशरफ अली अटकेत

नवी दिल्ली : देशभरात सणासुदीची धामधुम सुरू आहे. नवरात्रौत्सव सुरू असतानाच दिवाळीच्या तयारीचीही सुरुवात झालीय. याच दरम्यान, राजधानी दिल्लीत मोठा घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळण्यात आलाय. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं लक्ष्मी नगरच्या रमेश पार्क भागातून एका दहशतवाद्याला अटक केलीय. अटकेतील व्यक्ती पाकिस्तानी नागरिक असल्याचं समोर येतंय.

हत्यारं, दारुगोळा जप्त

बनावट भारतीय ओळखपत्राच्या आधारे ही संशयास्पद व्यक्ती दिल्लीत फिरताना आढळली. या दहशतवाद्याकडून ग्रेनेड, एके ४७ रायफल, अतिरिक्त बंदूक मॅगझीन आणि ६० राऊंड्स, एका हातगोळा तसंच ५० राऊंडसोबत दोन अत्याधुनिक पिस्तूल पप्त करण्यात आल्या आहेत.

आयएसआयकडून मिळालं ट्रेनिंग

दिल्लीत अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्याचं नाव मोहम्मद अशरफ अली असल्याचं समजतंय. दिल्ली अली अहमद नुरी नाव धारण करून तो राहत होता. अशरफ अली याला पाकिस्तानच्या आयएसआयकडून दिल्लीसहीत भारताच्या इतर भागांत दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात आल्याचंही सांगितलं जातंय. अशरफ अली याच्याकडून बनावट भारतीय पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे.

poonch encounter : काश्मीरमध्ये पंजाबचे तीन जवान शहीद; कुटुंबीयांना ५० लाखांची मदत आणि नोकरी
poonch encounter : जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, ५ जवान शहीद
उल्लेखनीय म्हणजेच, तीन दिवसांपूर्वी सुरक्षा यंत्रणेकडून हायअलर्ट जारी करण्यात आला होता. दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेची सूचना देण्यात आली होती.

गुप्तचर संघटनेकडून, सणासुदीच्या दिवसांत दहशतवद्यांकडून मोठा घातपात घडवून आणला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. याचसंदर्भात दिल्ली पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी शनिवारी पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती.

₹ ४,४४,४४,४४४ किंमतीच्या चलनी नोटांनी सजलं मातेचं मंदिर!
देशात निर्णय घेणारे सरकार, पंतप्रधान मोदींनी स्वत:चीच पाठ थोपटली



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: