बिटकॉइन वधारला, डोजेकॉइनमध्ये घसरण ; जाणून घ्या क्रिप्टो करन्सीचे आजचे भाव


हायलाइट्स:

  • एका बिटकॉइनचे मूल्य भारतीय चलनात तब्बल ४४ लाख ४५ हजार २७० रुपये इतके झाले.
  • आज मंगळवारी बिटकॉइनच्या किमतीत ४ टक्के वाढ झाली.
  • आशियातील इतर देशांच्या तुलनेत भारतात क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.

मुंबई : जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या बिटकॉइनमधील गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे.आज मंगळवारी बिटकॉइनच्या किमतीत ४ टक्के वाढ झाली. एका बिटकॉइनचे मूल्य भारतीय चलनात तब्बल ४४ लाख ४५ हजार २७० रुपये इतके झाले.

‘आकाशी’ झेप घे रे…! एका भेटीनंतर चक्र फिरली, झुनझुनवालांच्या विमान कंपनीला केंद्राचा ग्रीन सिग्नल
मागील वर्षभरात भारतात क्रिप्टो करन्सीबाबत गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड आकर्षण निर्माण झाले आहे. भारतात अद्याप या डिजिटल करन्सीला कायदेशीर मान्यता नाही. मात्र तरीही आशियातील इतर देशांच्या तुलनेत भारतात क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक संधी देणारे नवनवे व्यापारी मंच उदयास येत आहेत.

किंचित दिलासा ; सात दिवस दरवाढीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला हा निर्णय
मागील २४ तासात जागतिक क्रिप्टो करन्सी बाजारपेठेची उलाढाल १.०९ टक्क्यांनी कमी झाली. एकूण उलाढाल १७५.०२ लाख कोटी आहे. यात बिटकॉइनचा दबदबा कायम आहे. एकूण क्रिप्टोच्या बाजारात बिटकॉइनचा तब्बल ४६.५ टक्के आहे.

खूशखबर ; दिवाळीपूर्वी मिळणार ‘पीएफ’वर व्याज, जाणून घ्या कशी कराल खात्री
कॉइनडेस्क या क्रिप्टो करन्सी एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार आज बिटकॉइनच्या किमतीत ३.६८ टक्के वाढ झाली. त्याचे मूल्य ४४४५२७० रुपयांपर्यंत वाढले. त्याखालोखाल इथेरियमच्या किमतीत १.२१ टक्के वाढ झाली आहे. एका इथेरियम कॉइनचा भाव २७९००० रुपये झाला. तिथेरचा भाव ०.२१ टक्क्यांनी वधारला असून तो ७७.८४ रुपये आहे.

RBIने रेपो दर ठेवले ‘जैसे थे’; अधिक परताव्यासाठी एफडी नाही, तर इथं करा गुंतवणूक
कार्डानोच्या किमतीत आज १.१५ टक्के घसरण झाली आहे. एक कार्डानो कॉइनचा भाव भारतीय चलनात १७२ रुपये आहे. बिनान्स कॉइनमध्ये ०.४३ टक्के वाढ झाली असून त्याचा भाव ३२५५० रुपये आहे.

एक्सआरपीच्या किमतीत १.६३ टक्के घसरण झाली असून त्याचा भाव ९०.१९ रुपये आहे.पोलकाडॉटच्या एका कॉइनच्या किमतीत आज ३.६३ टक्के घसरण झाली. त्याचा भाव २७३६.९६ रुपये झाला. डोजेकॉइनला देखील आज नफावसुलीची झळ बसली. एका डोजेकॉइनचा भाव १८.३३१ रुपये झाला. त्यात ३.११ टक्के घसरण झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: