JK: ‘दहशतवाद्यांना सहानुभूती’चा आरोप, ७०० हून अधिक पोलिसांच्या ताब्यात


हायलाइट्स:

  • काश्मिरी पंडीत, शीख, मुस्लीम समाज दहशतवाद्यांच्या टार्गेटवर
  • सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांची हत्या
  • जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे ‘ओव्हरग्राऊंड वर्कर्स’ कार्यरत

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये गेल्या सहा दिवसांत काश्मिरी पंडीत, शीख आणि मुस्लीम समुदायाशी निगडीत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सात नागरिकांची दहशतवाद्यांकडून हत्या घडवून आणण्यात आलीय. यानंतर सुरक्षा दलाकडून जवळपास ७०० हून अधिक नागरिकांना ताब्यात घेण्यात आलंय. ‘दहशतवाद्यांना सहानुभूती‘चा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

सुरक्षा यंत्रणेनं ताब्यात घेतलेल्या नागरिकांतील बहुसंख्य बंदी घालण्यात आलेल्या ‘जमात ए इस्लामी’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. हे लोक दहशतवाद्यांच्या ‘ओव्हरग्राऊंड वर्कर्स’ (OGW) यादीत आहेत.

श्रीनगर, गांदरबल, बडगाम आणि दक्षिण काश्मीरच्या भागांतून या लोकांना ताब्यात घेण्यात आलंय. काश्मीर खोऱ्यात सामान्य नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांसंबंधी या लोकांना ताब्यात घेण्यात आलंय. दहशतवाद्यांकडून ‘सॉफ्ट टार्गेट’ म्हणून सामान्य नागरिकांचा वापर केला जात असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

हत्या प्रकरणांमुळे काश्मीर खोऱ्यातील तणाव पुन्हा एकदा वाढलाय. हल्ले रोखण्याच्या अपुऱ्या प्रयत्नांवरून विरोधी पक्ष नेते आणि स्थानिकांकडून प्रशासनावर टीकेची झोड उठवली जातेय.

Targeted Killings In JK: ‘जम्मू-काश्मीरच्या सामान्य नागरिकांकडून हिंसा आणि हत्यांचं समर्थन नाही’
Jammu Kashmir: बांदीपोरा, अनंतनागमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
गेल्या गुरुवारी श्रीनगरमध्ये एका शाळेत घुसून सुंदर कौर आणि दीपक चंद या दोन शिक्षकांची हत्या करण्यात आली होती. यातील एक शीख आणि दुसरा हिंदू धर्माशी संबंधीत असल्यानं बंदूकधारी दहशतवाद्यांनी त्यांना ‘टार्गेट’ म्हणून निवडल्याचं समोर आलं होतं.

मंगळवारी श्रीनगरच्या इक्बाल पार्कमध्ये एका मोठ्या स्थानिक व्यावसायिक आणि औषध दुकानांचा मालक असलेल्या ७० वर्षीय माखन लाल बिंदरू यांची त्यांच्याच दुकानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

तसंच, अज्ञात बंदुकधारी दहशतवाद्यांनी उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील हाजिन भागात SUMO अध्यक्ष नायदखाई मोहम्मद शफी उर्फ सोनू यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली.

इतर दोन नागरिकांत टॅक्सी चालक मोहम्मद शफी आणि पाणीपुरी विक्रेता वीरेंद्र पासवान यांचा समावेश आहे.

India China: भारत चीन सैन्य अधिकाऱ्यांची आठ तास बैठक, लडाख सीमेसंबंधी चर्चा
delhi police on high alert : दिल्लीत हाय अलर्ट जारी; सणासुदीला दहशतवादी हल्ल्याची शक्यता, गुप्तचर संस्थेचा इशारा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: