ICCने संघात बदल करण्याची मुदत वाढली; हार्दिक पंड्याबाबत या दिवशी निर्णय होणार


नवी दिल्ली: आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सर्व देशांना संघात बदल करण्याची मुदत वाढवून दिली आहे. ही मुदत १० ऑक्टोबर होती आता ती १५ ऑक्टोबर अशी करण्यात आली आहे. वर्ल्डकपच्या सामन्यांना १७ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. यामुळे भारताला आता १५ जणांच्या संघात बदल करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली निवड समिती भारतीय संघात आणखी एक जलद गोलंदाजाचा समावेश करण्याचा विचार करू शकते.

वाचा- #Fixerkings चेन्नई सुपर किंग्जवर फिक्सिंगचा आरोप; सोशल मीडिायवर राडा सुरू

भारताच्या निवड समितीला संघात बदल करण्यासाठी अजून ५ दिवसांचा वेळ आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हार्दिक पंड्याने आयपीएलच्या १४व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी केली नाही. हार्दिक गोलंदाजी करू शकेल का याबद्दल शंका आहे. त्यामुळेच बीसीसीआय संघात बदल करण्याचा विचार करू शकते. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात जे संघ सहभागी होणार होते त्याच्यासाठी १० ऑक्टोबर ही अखेरची मुदत होती. दोन वर्षापूर्वी पाठीच्या स्ट्रेस फॅक्चरमुळे हार्दिकवर सर्जरी झाली होती. त्यानंतर हार्दिकने अधिक गोलंदाजी केली नाही. आता वर्ल्डकपमध्ये तो गोलंदाजी करतो की फक्त फलंदाजीवर लक्ष देतो हे पाहावे लागले.

वाचा- दोन वर्षानंतर चाहत्यांना वाटले, माही मार रहा है! पाहा चेन्नईच्या विजयाचे VIDEO एका क्लिकवर

बीसीसीआयमधील एका वरिष्ठ सूत्रांनी वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या १५ जणांच्या संघात एका जलद गोलंदाजाची कमी आहे. आमच्याकडे शार्दूल ठाकूर आणि दीपक चाहर सारखे पर्याय आहेत. शार्दूल गोलंदाजीसह फलंदाजी करू शकतो हे त्याने सिद्ध केले आहे. तर दीपक चाहरने श्रीलंकेच्या दौऱ्यात फलंदाजीचे कौशल्य दाखवले आहे.

वाचा-Video चेन्नईच्या विजयानंतर रडू लागली लहान चाहती, धोनीने दिले खास गिफ्ट

जर हार्दिक गोलंदाजी करू शकत नसेल तर बीसीसीआय या दोघांपैकी एकाच्या नावाचा विचार करू शकते. हार्दिक सोबतच फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या नावाचा पुन्हा विचार करू शकते. चक्रवर्तीला गुढघ्याची दुखापत आहे. जर तो संघात खेळू शकत नसले तर भारताकडे युजवेंद्र चहलचा पर्याय आहे. टीम इंडियाकडे बायो बबलमध्ये नेट बॉलरच्या रुपात उमरान मलिक देखील उपलब्ध आहे. त्यामुळे नेट बॉलर म्हणून शिवम मावी कायम ठेवले जाते का हे देखील पाहावे लागले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: