Drug case and Nawab Malik: प्रवीण दरेकरांचा मलिकांवर हल्लाबोल; जावयाचे ड्रगप्रकरण काढत म्हणाले…


हायलाइट्स:

  • प्रवीण दरेकर यांचे नबाव मलिक यांच्यावर टीकास्त्र.
  • मलिक यांच्या जावयाला ड्रग प्रकरणी अटक झाली होती, म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा- दरेकर.
  • अन्यथा आघाडी सरकारनेच त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावे- दरेकर.

मुंबई: लखीमपूर हिंसेप्रकरणी (Lakhimpur Kheri Violence) राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या वक्तव्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी जोरदार टीकास्त्र सोडलंय. या प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. त्यावर टीका करताना दरेकर म्हणाले की, मलिक यांचं जर असंच म्हणणं असेल तर मग मलिक यांच्या जावयालाही ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. मग ते म्हणतात त्यानुसार मलिक यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा. (opposition leader pravin darekar criticizes minister nawab malik and demands his resignation)

प्रविण दरेकर यांनी ट्विटद्वारे ही टीका केली आहे. दरेकर ट्विटमध्ये म्हणतात, ‘आपल्या जावयाला ड्रग्ज तस्करी प्रकरणात NCB ने अटक केली होती. मग आता आपणही राजीनामा द्यावा किंवा सरकारने नवाब मलिकांचे मंत्री पद काढून घ्यावे.’

क्लिक करा आणि वाचा- दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा, ऊर्जा राज्यमंत्री म्हणाले…

प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदवरही सडकून टीका केली आहे. ज्यावेळी महाराष्ट्रात गोवारी हत्याकांड, मावळ गोळीबार, पालघर साधू हत्याकांड झालं त्यावेळेस कुठं होतं सरकार? तेव्हा का नाही केलात बंद?, असे एकावर एक सवाल उपस्थित करत असतानाच हा केवळ चौकशांवरुन महाराष्ट्राचे लक्ष विचलित करण्याचा नियोजित कार्यक्रम असल्याची टीका दरेकर यांनी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- अमृता फडणवीस यांची महाविकास आघाडीला पुन्हा डिवचले, म्हणाल्या…

हा महाराष्ट्र बंद सरकार पुरस्कृत असल्याची टीकाही दरेकर यांनी केली आहे. ते म्हणाले की, राज्यात ज्या पक्षांचं सरकार आहे तेच पक्ष जर अशा पद्धतीने सरकारी मालमत्तेचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. या पेक्षा खराब राजकारण महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच झालं नाही. सरकार पुरस्कृत दबाबतंत्र वापरुन बंद यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘महाराष्ट्र बंद हा सरकार पुरस्कृत दहशतवादच’; फडणवीस यांचा निशाणाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: