RCB vs KKR Eliminator : एलिमिनेटरच्या महामुकाबल्यापूर्वी विराट कोहलीचं मोठं वक्तव्य, म्हणाला…


शारजा : आरसीबी आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन संघांत आता एलिमिनेटचा सामना होणार आहे. पण या महामुकाबल्यापूर्वीच कोहलीने मोठे वक्तव्य केले आहे. कारण आजचा सामना जर आरसीबीने गमावला तर कोहलीवर एकदाही संघाला जेतेपद जिंकवून न देण्याचा ठपका बसू शकतो.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीला आतापर्यंत एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात जर आरसीबीचा संघ पराभूत झाला तर कोहलीच्या कारकिर्दीवर एक मोठा डाग लागेल. त्यामुळे कोहलीने आयपीएलच्या या महत्वाच्या सामन्यापूर्वी एक मोठे वक्तव्य केले आहे. कोहलीच्या या वक्तव्याने कर्णधारावर किती दबाव असतो, हेदेखील समजता येऊ शकते.

कोहली यावेळी म्हणाला की, ” आयपीएल जेव्हा सुरु होते, तेव्हा प्रत्येक सामन्यात दडपण असते. जसजसे प्ले-ऑफचे सामले जवळ येतात तेव्हा हे दडपण वाढायला सुरुवात होते. माझ्यामते क्वालिफायर्स आणि एलिमिनेटर हे दोन्ही शब्द दडपण अधिक वाढवत असतात. त्यामुळे या सामन्यांमध्ये खेळणे सोपे नसते. एलिमिनेटरमध्ये तर दुसरी संधीही नसते. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असता तेव्हा तुम्ही जिंकत असता किंवा पराभवाचा सामना करावा लागतो. माझ्यामते जेव्हा तुमच्याकडे दोन पर्याय असतात तेव्हा तुमची मानसिकता ही निगेटीव्ह होते आणि त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो.”

कोहलीवर एलिमिनेटर आणि क्वालिफायर या दोन शब्दांचे मोठे दडपण येत असल्याचे त्यानेच सांगितले आहे. आज आरसीबीचा केकेआरबरोबर एलिमिन्टरचा सामना आहे. हा सामना जिंकल्यावरच त्यांना अंतिम फेरीत्या दिशेने कूच करता येणार आहे, पण हा सामना गमावला तर आरसीबीचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये सुरू होण्यापूर्वी त्यांना आरसीबीने आपल्या गोटात घेतले होते. वानिंदू हसरंगा आणि दुश्मंथा चमिरा हे ते दोन खेळाडू आहेत. टी-२० विश्वचषकातील पात्रता सामन्यांसाठी दोघेही श्रीलंका संघात सामील होतील. त्यामुळे दोघांनाही आरसीबीच्या बायो बबलमधून मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे या आता आरसीबीला मोठा धक्का बसला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: