Video चेन्नईच्या विजयानंतर रडू लागली लहान चाहती, धोनीने दिले खास गिफ्ट


दुबई: चेन्नई सुपर किंग्जने रविवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत आयपीएल २०२१च्या फायनलमध्ये प्रवेश केला. पहिल्या क्वॉलिफायल सामन्यात कर्णधार महेंद्र सिंह धोनीने विजय चौकार मारला. या सामन्यानंतर धोनीने जे काही केले त्याचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे.

वाचा- #Fixerkings चेन्नई सुपर किंग्जवर फिक्सिंगचा आरोप; सोशल मीडिायवर राडा सुरू

धोनीने या सामन्यात ६ चेंडूत १८ धावा केल्या. या दरम्यान त्याने ३ चौकार आणि १ षटकार मारला. चेन्नईला अखेरच्या षटकात विजयासाठी १३ धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवर मोईन अली बाद झाला. ही विकेट पडल्यानंतर प्रेक्षकांच्या उपस्थित असलेली एक लहान मुलगी रडू लागली. कारण चेन्नई सुपर किंग्जचा संघ संकटात होता. या मुलीसोबत असलेला एक मुलगा देखील रडत होता. पण त्यानंतरच्या सलग ३ चेंडूवर धोनीने चौकार मारून संघाला विजय मिळून दिला. या विजयानंतर मुलीच्या चेहऱ्यावर हसू आले. तेव्हा देखील तिच्या डोळ्यातून आश्रू येत होते. पण ते आनंदाचे होते. त्या मुलीची आई तिला जवळ घेऊन आनंद साजरा करत होती.

वाचा- BCCIने टी-२० वर्ल्डकप संघात बदल केला का? जाणून घ्या मोठी अपडेट

चेन्नईच्या विजायनंतर धोनीने चेंडूवर स्वाक्षरी करून तो चेंडू बाल्कनीत असलेल्या मुलाला दिला. या दोन्ही मुलांच्या (जे भाऊ-बहिण असल्याचे वाटते) आयुष्यातील हा क्षण कधीच विसरता येणार नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा- मुंबई इंडियन्स घेणार मोठा निर्णय; या खेळाडूंना मिळणार डच्चू!

या सामन्यात दिल्लीने विजयासाठी १७३ धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईने ६ विकेटच्या बदल्यात ते पार केले. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने ७०, रॉबिन उथप्पाने ६३ तर धोनीने ६ चेंडूत नाबाद १८ धावा केल्या.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: