राष्ट्रवादी अल्पसंख्यांक प्रदेश महासचिवपदी सादिक खाटीक

आटपाडी दि.९ /१०/२०२१/प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश महासचिव पदी सांगली जिल्ह्यातील आटपाडीचे सादिक पापामियाँ खाटीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मोहंमद खान पठाण नांदेड यांनी सादिक खाटीक यांच्या नियुक्तीचे पत्र सोलापूर येथील शासकीय विश्रामधाम येथे सादिक खाटीक यांना प्रदान केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार शुक्रवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी सादिक खाटीक यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या शिफारशिने सादिक खाटीक यांची नियुक्ती केली गेली आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येयधोरणे सर्वसामान्यां पर्यन्त पोहचवून पक्ष मजबुत करण्यासाठी सादिक खाटीक यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा ॲड. मोहंमद खान पठाण यांनी व्यक्त केली .
राज्यातील अल्पसंख्यांक, मुस्लीम मागास , ओबीसी ,एस .सी .,एस.टी. प्रवर्गातील सर्व घटक , शेतकरी, कष्टकरी,भगिनी,युवक, युवती,अंध अपंग अशा समाजातील सर्वच घटकांसाठी सादिक खाटीक यांनी केलेल्या कार्यातून त्यांचे नेतृत्व साकारले आहे .
राज्यातील अल्पसंख्याक, उपेक्षित, वंचित, मागास ,समाज बांधवांसह सर्वच समाज घटकांकडे श्रद्धा, आपुलकीने लक्ष देत या पक्षीय व्यासपीठावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अल्पसंख्याक विभागाला मजबूत करण्याचा माझा प्रामाणीक आणि पुरेपुर प्रयत्न राहील असा आशावाद नवनियुक्त महासचिव सादिक खाटीक यांनी व्यक्त केला .
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शफी इनामदार,एम. डी.शेख ,वसीम बुऱ्हाण,जावेद खैरदी,फारूक मटके, वारीस कुंडले,गणी पठाण,बशीर शेख, बिसमिल्ला शिकलगार, शमशाद काझी ,गफूर शेख, सर्फराज बागवान ,जाकीर उर्फ बाळासाहेब शेख, नौशाद शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अल्प संख्याक विभागाचे पदाधिकारी तसेच अफजल आयुब कुरेशी पंढरपूर, रियाज हजरत शेख ,अरीफ इनामदार मुल्ला आणि कुर्बानहुसेन सादिक खाटीक आटपाडी आदी उपस्थित होते.