पंढरपूरचे आशास्थान आबासाहेब

कोणतीही गोष्ट मनापासून आणि पूर्ण प्रयत्नाने, पूर्ण शक्तीने प्रामाणिकपणे करण्याचा स्वभाव यशाची खात्री देत असतो. कोणत्याही व्यवसायात आणि क्षेत्रात आपल्या लाघवी मितभाषी प्रेमळ स्वभाव आणि छाप पाडणारे पंढरपूर परिसरातील अजात शत्रू व्यक्तिमत्व एक यशस्वी उद्योगपती अभिजीत उर्फ आबासाहेब धनंजय पाटील पंढरपूरपासून जवळच असणाऱ्या देगाव या खेडेगावातील परंपरागत शेतीचा व्यवसाय असणाऱ्या कुटुंबातील पंढरपुरातील नामांकित विधीत कैलास वासी डी व्ही उर्फ धनंजय पाटील यांचे आबासाहेब हे चिरंजीव. आबासाहेंबांचा जन्म १ऑगस्ट १९८३ रोजी झाला. वडिलांनी शेतीचा व्यवसाय बरोबरच वकिली व्यवसायात पदार्पण करून एक नामांकित वकील म्हणून प्रसिद्धी मिळवली होती. आबासाहेबांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वेगवेगळ्या व्यवसायामध्ये यशस्वी ठरून यशस्वी उद्योजक अशी प्रतिमा पंढरपूर परिसरात बनवली आहे.

अयोग्य व्यवस्थापन दुष्काळ आणि इतर बरेच कारणामुळे साखर कारखानदारीचा व्यवसाय डबघाईला येत आहे. अशा कठीण समयी आबासाहेबांनी साखर कारखाना संचलित करावयास घेऊन धाराशिव सहकारी साखर कारखाना यशस्वीपणे चालवून तेथील कामगारांचे संसार उघड्यावर येण्यापासून वाचवले आहे. आणि आपल्या मोठ्या मनाने कामगारांविषयी बद्दलची तळमळ आपुलकी साखर कारखान्याची मुळी पूजन हे साध्या कामगाराकडून करून घेऊन कृतीतुन दाखवुन दिले. धाराशिव साखर कारखान्यातील यशापासुन कारखानदारीत सुरू झालेली वाटचाल बाबासाहेबांनी पुढे दोन युनिट चालू करून आणि ती यशस्वीरीत्या संचलित करून या व्यवसायात आपले पाय खंबीरपणे रोवून 2 ते 3 हजार लोकांच्या रोजगाराची सोय करून दिली आहे. आपल्या असामान्य व्यवस्थापन कौशल्याने अतिशय अवघड परिस्थितीत हसत खेळत निर्णय घेऊन लोकांना आपलंसं करून प्रश्न चुटकीसरशी सोडविण्याची वृत्ती या कारखानदारीत आबासाहेबांनी यश मिळवुन दाखवून दिले .या साखर कारखान्यातून नुसतेच आर्थिक फायदा करून घेण्याचं गणित न ठेवता कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र शासनाने सरकारी आणि खाजगी क्षेत्राला आवाहन केल्यानंतर मेडिकल ऑक्‍सिजनचा प्रकल्प तातडीने उभा करणारे धाराशिव सहकार साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून महाराष्ट्रभर आबासाहेबांचा गौरव करण्यात आला ध धाराशिव सहकारी साखर कारखाना तून मेडिकल ऑक्सिजनचा प्लांट ओपन केल्यानंतर त्यात नीर्माण केलेला मेडीकल आॉक्सिजन अतिशय कमी दरात अथवा वेळ पडल्यास मोफत देऊन आबासाहेबांनी आपण सामाजिक जबाबदारी कर्तव्य समजून करतोय हे सर्वांना दाखवून दिले .

पंढरपूर शहरातील जुन्या काळात कार्यरत असणारे अकबर अरुण ,अकबर सरगम अशी सर्व चित्रपटगृहे बंद पडली आणि पण पंढरपुरातील लोकांना चित्रपट चित्रपट पाहण्यासाठी सोलापूर सारख्या शहरांमध्ये या आधुनिक काळात जाण्याची वेळ येऊ लागली .अशावेळी एक व्यवसायिक या नात्याने आबासाहेबांनी पुणे मुंबईच्या धर्तीवर पंढरपुरातील चित्रपट रसिकांसाठी डीपी मल्टी फ्लेक्स या चित्रपटगृहाची निर्मिती केली. त्या चित्रपटगृहाच्याबरोबरीनेच डीवीपी मॉल ची निर्मिती करून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला

शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतीचे आवड असणे अपरिहार्य आह ट्रॅक्टर ,शेती अवजारे पुरविण्याच्या व्यवसायात पदार्पण करून एक यशस्वी डीलर म्हणून महाराष्ट्रात वरचं स्थान मिळवलं. पंढरपूर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट सेवा देणाऱ्या या यादीमध्ये एक उद्योजक म्हणून आबासाहेब आणि त्यांच्या ग्रुप आघाडीवर आहे.

पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशभरातून भाविकांची सतत वर्दळ चालू असते या येणाऱ्या भाविकांच्या गरजा लक्षात घेऊन आबासाहेबांनी “विठ्ठल कामत ” हा हॉटेल व्यवसाय चालू करून भाविकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला .

आबासाहेबांना पूर्वीपासूनच खेळाची आवड होती त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये त्यांनी विविध क्रीडा प्रकारात भाग घेतला होता. पंढरपुरामध्ये क्रिकेटव्यतिरिक्त इतर कुठलाही खेळ खेळताना सहजा मुलं दृष्टीस पडत नाहीत .आबासाहेबांना फुटबॉल हा खेळ खूप आवडतो परंतु सांगली कोल्हापूर परिसरात फुटबॉलला असणारी प्रचंड लोकप्रियता तरुणांचा सहभाग मैदाने कोच या गोष्टींचा पंढरपुरात अभाव होता पंढरपूर परिसरातील तरुण आणि मुले या खेळा पासून कोसो दूर होते ही बाब लक्षात आल्यामुळे फुटबॉल या खेळाची लोकप्रियता आणि पंढरपूर परिसरातील तरुणांचा ,विद्यार्थ्यांचा कल या खेळाकडे वाढविण्याच्या दृष्टीने आबासाहेबांनी पंढरपुरात रेल्वे मैदानावर राज्यस्तरीय फुटबॉल टूर्नामेंट आयोजित करून प्रसिद्ध फुटबॉल संघांना यामध्ये सामील करून संपूर्ण पंढरपूर फुटबॉल माय करून टाकले आणि यामुळे पंढरपूर शहर आणि परिसरात फुटबॉल या खेळाला लोकप्रिय करण्याचे बीजारोपण आदरणीय बाबासाहेबांनी केले यात काही शंकाच नाही

covid-19 या विषाणूच्या संसर्गामुळे शासनाने अचानक लॉकडाऊन जाहीर केला आणी अचानक अनेकांचा रोजगार निघून गेला लोकांवर उपासमारीची वेळ आली अशावेळी उद्योजक असलेल्या बाबासाहेबांच्या मनातला समाजसेवक जागा झाला आणि त्यांनी कोरोना काळामध्ये अन्नधान्याचे किट वाटप केले बरेच जणंना आर्थिक मदत केली आणि केोरोना काळात वैद्यकीय सेवा शी संबंधित सर्व सेवकांसाठी स्वतःच्याच डीवीपपी मॉल या व्यवसायाच्या ठिकाणी व्यवसाय बंद करून त्यातील नफा-तोटा याचा विचार न करता मोफत अन्नदानाची सोय करून दिले यानंतर च्या काळात जीवनमान थोडस सुरळीत होत असतानाच पुन्हा कोणाची दुसरी लाट आली आणि तीी लाट इतकी प्रचंड होती की उपलब्ध वैद्यकीय सुविधा हॉस्पिटल्स कमी पडायला लागले पंढरपुरातून बाहेरून येणाऱ्या रुग्णांचा लोंढा मोठ्या प्रमाणात वाढला होता पंढरपुरातील वैद्यकीय सेवा सुविधांवर प्रचंड ताण पडायला लागला होता अशाच वेळी आबासाहेबांनी स्वतः डी व्ही पी मॉल चा व्यवसाय बाजूला करून त्याच इमारतीत रुग्णांच्या सेवेसाठी अल्पावधीतच त्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या व्हेंटिलेटर ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर अशा मशीन या रुग्णालयात उपलब्ध करून बऱ्याच रुग्णांचे प्राण वाचवले अशावेळी आर्थिक तोटा होईल का अशा कोणत्याही बाबीचा विचार आबासाहेबांनी केला नाही

मागील वर्षी 2020 झाली पंढरपुरातील बऱ्यापैकी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या ग्रामपंचायत ग्रामीण भागातील स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेतील शेवटचा थर असलेली पंचायत आहे .या निवडणुकी गावागावात बरेचसे वाद-विवाद तंटे निवडणुकीवरून होत असतात त्या गोष्टी घडू नये म्हणून यावेळच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी आबासाहेबांनी पंढरपूर तालुक्यामधील ज्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात येईल त्या ग्रामपंचायतीला एक लाख रुपयांचे पारितोषक वैयक्तिक स्तरावर देण्याचे जाहीर केले यातून बाबासाहेबांनी निवडणुकीच्या काळात गावोगावी होणारे वाद टाळण्याचा अभिनव मार्ग दाखवून दिला होता तसेच निवडणुका बिनविरोध झाल्यास गावातील चांगल्या सुशिक्षित आर्थिक स्थिती नसणारेही उमेदवार ग्रामपंचायतीत प्रवेश करू शकतात .बाबासाहेबांच्या या आव्हानाला तालुक्यातील पाच ते सहा ग्रामपंचायतीने गावांनी प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गावातील ग्रामपंचायती निवडणूका बिनविरोध केल्या. यामुळे या गावांमध्ये निवडणूक काळात असणारा वाद-विवाद टाळला गेला परस्पर सामंजस्याने गावकऱ्यांनी गावातील चांगलीच लोक ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिले आणि आबासाहेबांचा हा प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी ठरला आबासाहेबांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी नेहमी समाजपयोगी कामास प्राधान्य दिले होते आणि आहे आबा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत अनेक वेळा रक्तदान नेत्रदान शिबीरे आयोजित करण्यात आली होती तसेच गोरगरिबांना जेवण धान्य वाटप असेही कार्यक्रम आज पर्यंत केले गेले आहेत .

2020 चालेल पंढरपुरातील भीमा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकडील परीक्षेत लॉक विस्थापित कॅम्पसमध्ये ठेवण्यात आली होती याही वेळेला डीपी ग्रुप तर्फे बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे पूरग्रस्तांना अन्नधान्य आणि गरजेच्या वस्तू याचे वाटप करण्यात आले होते सध्या पंढरपुरातील राजकीय परिस्थिती पाहता सर्व सहकारी संस्था सत्तेचे ठिकाणी एकाच विशिष्ट ठिकाणी एकाच समूहाकडे केंद्रित झालेले आहेत पंढरपुरातील विधानसभा पोटनिवडणूक निकाल झाल्यापासून पंढरपुरातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात योग्य लायक नेताच नसल्याचे लोकांच्या लक्षात आले आहे अशा वेळी ज्या ज्या क्षेत्रात प्रवेश करते झाले त्या त्या क्षेत्रात यश मिळविणाऱ्या उद्योगपती आबासाहेब यांच्या राजकारणात येण्याच्या चर्चा सुरू झाली लोकांमध्ये बाबासाहेबांनी पंढरपुरातील राजकारणात प्रवेश करावा यावर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली यावरून ही बाब स्पष्ट झाली आहे की येणाऱ्या काळामध्ये एक यशस्वी उद्योग इ राजकारण समाजकारण असलेले बाबासाहेब एक राजकारणी म्हणून ही पंढरपुरातील लोकांना हवेहवेसे वाटू लागल जातोय गावाला बाबासाहेबांचे आजवरची कारकीर्द पाहता आबासाहेब पंढरपुरातील जनतेसाठी तरुणांसाठी योग्य नेतृत्व ठरत आहेत व ते पंढरपुरातील राजकारणात उतरून पंढरपुरातील जनतेचे प्रतिनिधित करतील आणि पंढरपूरचा विकास आ मोठ्या प्रमाणावर घडवून आणतील अशी अपेक्षा पंढरपुरातील जनता ठेवून आहे या पंढरपुराची च्या अपेक्षा भविष्यकाळात बाबासाहेब पूर्ण करतील आणि त्यांनी कराव्या याकरता त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा…..

शब्दांकन – एडवोकेट सुरेश कांबळे.पंढरपुर (कायदेशीर सल्लागार साप्ताहिक पंढरी उदय)

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: