पती हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत करत होता व्हॅलेंटाइन वीक साजरा, पत्नीने पकडून बदड बदड बदडले


आग्रा: उत्तर प्रदेशातील आग्रा पोलिस स्टेशनच्या सिकंदरा भागात हायवेवरील हॉटेलमध्ये एका तरुणाला त्याच्या पत्नीने त्याच्या मैत्रिणीसोबत मौजमजा करताना पकडले. व्हॅलेंटाइन वीक साजरा करण्यासाठी हा तरुण आपल्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये पोहोचला होता. मात्र पत्नीने दोघांनाही पकडून बेदम मारहाण केली. संधी मिळताच प्रेयसीने आपला जीव वाचवण्यासाठी तेथून कशीतरी पळ काढली. मात्र तिने पतीला पोलिसांकरवी पकडले. या तरुणाच्या पत्नीने हॉटेलबाहेर एकच गोंधळ घातला. घडलेल्या प्रकारामुळे बघ्यांची गर्दी उसळली.

बुधवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली. सिकंदरा भागातील एक तरुण त्याच्या मैत्रिणीला गुरु का तालजवळील हॉटेलमध्ये घेऊन आला होता. हा प्रकार पत्नीला कळला. क्षणाचाही विलंब न लावता पत्नी हॉटेलवर पोहोचली. तिने पतीला त्याच्या मैत्रिणीसह पकडले. दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

गौतम अदानींना सर्वात मोठा झटका; बड्या फ्रेंच कंपनीने ५० अब्ज डॉलर्सचा प्रकल्प थांबवला
दरम्यान, आपले बिंग फुटले असे लक्षात आल्यानंतर संधी मिळताच प्रेयसीने तेथून पळ काढला, मात्र महिलेने तेथेच गोंधळ घालायला सुरू केले. त्यानंतर नियंत्रण कक्षाला फोन करून पोलिसांना पाचारण करण्यात आले. घडलेला सगळा प्रकार पाहिल्यानंतर हॉटेलचे कर्मचारीही घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी पती-पत्नीला पकडून पोलिस ठाण्यात आणले.

अदानींच्या या कंपनीला मोठा धक्का! नफा ९६% नी घटला, मात्र शेअर बाजारात घडला चमत्कार
पतीसह पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या महिलेने पोलीस ठाण्यातही चांगलाच गोंधळ घातला. महिलेने पतीविरुद्ध लेखी तक्रार दिली. पत्नीच्या लेखी तक्रारीनंतर पोलिसांनी पती आणि पत्नीच्या कुटुंबीयांनाही बोलावले. महिलेने सांगितले की, ती बऱ्याच दिवसांपासून आपल्या पतीची अशी कृत्ये पाहत होती. पत्नीला आपल्या पतीच्या बाहेरख्यालीपणाबाबत माहिती मिळाली होती. तेव्हापासून ती पतीवर लक्ष ठेवूनच होती. गेल्या काही दिवसांपासून नवऱ्याच्या मागे लागली होती.

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये LIC चे मोठे नुकसान झाले का? ; सरकारने केला मोठा खुलासा

आज पतीला रंगेहात पकडले

आज मात्र पत्नीला आपल्या पतीला रंगेहाथ पकडण्याची संधी मिळाली. आपला पती एका मैत्रिणीसोबत एका हॉटेलमध्ये व्हॅलेंटाइन विक साजरा करण्यासाठी गेला असल्याची पक्की खबर पत्नीला मिळाली होती. त्यानंतर तिने कशाचाही विचार न करता आज आपल्या पतीला रंगेहात पकडायचेच असे मनाशी पक्के करून तिने आपला मोर्चा हॉटेलकडे वळवला आणि पतीला रंगेहात पकडले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: