तुमचा पराभव निश्चित समजा,जो मनातून हारतो तो रणात काय जिंकणार, वसंत मोरेंचा इशारा


पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका घेण्यात याव्यात अशी भूमिका घेतली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका लवकर घेण्यात यावी, अशी भूमिका मांडली. मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीचा दाखला देत पुणे महापालिकेची निवडणूक घेण्याची मागणी केली. वसंत मोरे यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे. प्रशासनाकडून पुण्याचं वाट लावण्याचं काम सुरु असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला.

वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय?

मनसे नेते वसंत मोरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला एक प्रश्न असल्याच म्हटलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या दोन आमदारांचं नुकतंच निधन झालं. तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या, असं वसंत मोरे यांनी सरकारला म्हटलं. मागील एक वर्षापासून आमच्या शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे, असं वसंत मोरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी नागरिकांना गुडन्यूज, राज्यात ५०० ठिकाणी सुरू होणार ‘आपला दवाखाना’

विकास कामे ठप्प झाली आहेत निधी नसल्यामळे नागरिकांना भेटू वाटत नाही, असंही वसंत मोरे म्हणाले. पुण्यातील आमदार खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पाहावे आणि हो जर कोणत्या पक्षाला सहनुभुती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असताल तर तुमचा पराभव निश्चित समजा कारण जो मनातून हारतो तो रणात काय जिंकणार, असंही वसंत मोरे म्हणाले.

बिझनेस माईंड ते मुकेश अंबानींचा राईड हँड, रिलायन्समधील सर्वात शक्तीशाली कोण आहेत मनोज मोदी…

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे आग्रही

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका विविध कारणांमुळं लांबणीवर पडल्या आहेत. सुरुवातीला ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा आणि आता प्रभाग रचना बदलण्याची राज्य सरकारची भूमिका यामुळं स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. महाराष्ट्रातील नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. राज्यातील विविध महापालिकांमध्ये प्रशासकांकडून कारभार सुरु आहे त्याला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता निवडणुकांचा मुद्दा उचलला आहे. मनसेकडून मुंबई पाठोपाठ पुण्यातही महापालिका निवडणुकांचा मुद्दा उचलण्यात आला आहे.

Kasba Bypoll: राहुल गांधींचा एक फोन आला अन् कसब्यातील काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराची माघारSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: