बिझनेस माईंड ते मुकेश अंबानींचा राईड हँड, रिलायन्समधील सर्वात शक्तीशाली कोण आहेत मनोज मोदी…


नवी दिल्ली : देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहे रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) . रिलायन्स समूह (Reliance Group) सगळ्यात वजनदार व्यक्ती म्हणदे अंबानी कुटुंबीय. मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी या नावांवर संपूर्ण रिलायन्स समूह सुरू आहे. पण या सगळ्यामागे खास मास्टरमाईंड कोणी औरच आहे. रिलायन्सचा प्रत्येक मोठा प्रकल्प यशस्वी करण्यामागे या व्यक्तीचा मोठा वाटा असतो. ते नाव आहे मनोद मोदी यांचं (Manoj Modi) .

मनोज मोदींना संपूर्ण व्यापार विश्वास मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा राईट हँड म्हणून ओळखलं जातं. ते अंबानींचे वर्गमित्र आहेत. महत्त्वाचं म्हणजे अंबानी यांनी त्यांच्या कुटुंबियांनी आणि मित्रांना त्यांच्या व्यवसायामध्ये महत्त्वाच्या स्थानी ठेवलं आहे. यातले एक आहेत मनोज मोदी.

खरंतर, रिलायन्सच्या भल्या मोठ्या यशामागे मनोज मोदी यांचा मोठा हात आहे. पण असं असलं तरी त्यांना देशात आणि विदेशात फार कमी लोक ओळखतात. बातम्यांमध्येही तुम्हाला त्यांचं नाव कमीच पाहायला मिळेल. पण ते रिलायन्स ग्रुपच्या सगळ्यात मोठ्या लोकांमध्ये मोडले जातात. रिलायन्सच्या सगळ्या महत्त्वाच्या निर्णयामागे त्यांचं डोकं असतं. यामुळेच उद्योग विश्वास त्यांना अंबानींचा राईट हँड म्हणून ओळखतात. त्यांची एमएम अशीही ओळख आहे.

हिंडेनबर्गने आणखी एक बॉम्ब टाकला; यावेळी अदानींचे काय होणार? संस्थापक म्हणाले…
मोठं पद नसलं तरी मनोज मोदींची ताकद मोठी….

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज मोदी यांच्याकडे बरंच दिवस कोणतंही मोठं पद नव्हतं. पण कंपनीत त्यांची ताकद मोठी आहे. खरंतर, ते कोणत्याही व्यवसायाचे अधिकृतपणे प्रमुख नव्हते. पण तरीदेखील रिलायन्सच्या सगळ्या निर्णयामागे त्यांचं डोकं आणि प्लॅनिंग असतं. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये सीईओ नाही आहेत पण त्या पदाला बरोबर असं नाव आहे ते मनोज मोदी यांचं. मनोज मोदी हे सध्या रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओचे संचालक आहेत.

मनोज मोदी आणि मुकेश अंबानी हे इंजिनिअरिंग महाविद्यालयात एकत्र शिकण्यासाठी होते दोघेही कॉलेजपासूनच मित्र आहेत. दोघांनी मुंबई विद्यापीठात एकत्र इंजिनीअरिंग केलं आणि नंतर केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर डिग्री घेतली.

Gold Price Today: जागतिक बाजारात सोने-चांदीला तेजीने चकाकी; भारतीय बाजारात हे आहेत आजचे दर
१९८० मध्ये मनोज मोदी यांचा रिलायन्स इंडस्ट्रीजशी संबंध आला. त्यांनी आतापर्यंत अंबानी यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांसोबत काम केलं आहे. धीरूभाई अंबानींनंतर मुकेश अंबानीं आणि आता ईशा, आकाश आणि अनंत अंबानींसोबतही ते काम करत आहेत. २००७ मध्ये त्यांच्याकडे संचालकपद देण्यात आलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिलायन्सच्या अनेक मोठ्या व्यवसायांमध्ये मनोज मोदी यांचं स्थान मोठं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: