मध्यरात्री कडकडून भूक, रेस्टॉरंट बंद; तरीही केवळ १० सेकंदांत ऑर्डर आली; कोणती ट्रिक वापरली?


सध्या सगळीकडे आर्टिफिशल इंटेलिजन्सची चर्चा आहे. चॅट जीपीटीची हवा आहे. कितीही ऍडव्हान्स टूल्स आले तरीही मानवी मेंदूशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. कारण बाजारात येणारी अत्याधुनिक टूल्स मानवी मेंदूतूनच जन्माला आली आहेत. याचाच प्रत्यय बंगळुरूतील कोरामंगला परिसरात पाहायला मिळाला.

बंगळुरूत वास्तव्यास असलेल्या केलब फ्रिजेन नावाच्या कॅनेडियन तरुणाला मध्यरात्री कडकडून भूक लागली. त्यानं जवळच असलेलं कोरामंगला येथील मॅक्डॉनल्डस गाठलं. रेस्टॉरंट बंद झाल्याचं त्याला समजलं. केलब हताश झाला. मात्र तितक्यात त्याला रेस्टॉरंटच्या बाहेर ऑनलाईन ऑर्डर घेण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉईजची गर्दी दिसली. त्यानंतर केलबनं शक्कल लढवली.
फेशियलचा बहाणा, नवरदेव पळाला; लहान भावानं वहिनीसोबत लग्न करताच मोठा भाऊ परतला अन् मग…
केलबनं त्याच्या मोबाईलमधील स्विगीचं ऍप उघडलं. मॅक्डॉनल्डसच्या समोर उभा राहून त्यानं ऑर्डर केली. पत्त्याच्या जागी त्यानं मॅक्डॉनल्डसच्या बाहेर लिहिलं. थोड्याच वेळात त्याला ऑर्डर मिळाली. मॅक्डॉनल्डसमधून डिलिव्हरी बॉय निघाला, जिना उतरला, त्याच्या समोरच केलब उभा होता. त्यामुळे डिलिव्हरी बॉयला केलबपर्यंत ऑर्डर पोहोचवायला केवळ १० सेकंद लागली. केलबनं हा किस्सा ट्विटरवर शेअर केला आहे.

या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया आहेत. अनेकांनी केलबच्या हुशारीचं कौतुक केलं आहे. चॅट जीपीटी असो वा एआय टूल कोणीही मानवी मेंदूची जागा घेऊ शकत नाही, अशा आशयाच्या प्रतिक्रिया ट्विटखाली वाचायला मिळत आहेत. ‘रेस्टॉरंट बंद झाल्यानं आईसटी देऊ शकत नसल्याचं मला बर्गरकिंगनं सांगितलं. त्यानंतर मी स्विगीवरून ऑर्डर केली, तीही बर्गरकिंगच्या पायऱ्यांवर बसून,’ असा अनुभव एका तरुणीनं शेअर केला आहे. थोडक्यात काय केलबनं वापरलेली आयडिया अनेकांना आवडली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: