aryan khan mehbooba mufti : ‘खान असल्यामुळे शाहरुखच्या मुलाला टार्गेट केलं जातंय’, मुफ्तींचा भाजपवर आरोप


श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती ( mehbooba mufti ) यांनी बॉलिवडू अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन ( aryan khan ) याच्या अटकेवरून केंद्रातील सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारला लखीमपूर खिरीची ( lakhimpur case ) घटना दिसत नाहीए. पण २३ वर्षांच्या एका मुलाला केंद्रीय संस्थांकडून लक्ष्य केलं जात आहे. आर्यन हा ‘खान’ असल्याने त्याला त्रास दिला जातोय, असा आरोप मेहबूबा मुफ्ती यांनी केला.

अर्यन खानच्या अटकेप्रकरणी मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विट केलं. चार शेतकऱ्यांच्या हत्येचा आरोप असलेल्या एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर कारवाई करण्याऐवजी केंद्रीय संस्था मात्र २३ वर्षांच्या मुलामागे हात धुवून लागल्या आहेत. कारण त्याचे आडनाव ‘खान’ आहे, असं ट्विट मुफ्ती यांनी केलं. मतदारांना खूश करण्यासाठी भाजप मुस्लिमांना टार्गेट करत आहे. हे न्यायाचे विडंबन आहे, असा आरोपही मुफ्तींनी केला.
poonch encounter : जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, ५ जवान शहीद

राजकीय फायद्यासाठी केंद्र सरकार बळाचे धोरण राबवत आहे. जम्मू -काश्मीरमधील परिस्थिती बिकट झाली आहे. सुधारणेऐवजी केंद्र सरकार निवडणुकीत राजकीय लाभ मिळवण्यासाठी बळाचा वापर करण्याचे धोरण सुरू ठेवेल. उत्तर प्रदेशात होणारी आगामी विधानसभा निवडणूक हे याचे कारण आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी केला.

JK: ‘दहशतवाद्यांना सहानुभूती’चा आरोप, ७०० हून अधिक पोलिसांच्या ताब्यातSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: