#Fixerkings चेन्नई सुपर किंग्जवर फिक्सिंगचा आरोप; सोशल मीडिायवर राडा सुरू


दुबई: सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा यांच्या शतकी भागिदारीनंतर कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या ६ चेंडूतील नाबाद १८ धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने नवव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला. चेन्नईच्या विजयानंतर एका बाजूला त्याचे चाहते खुश असताना दुसऱ्या बाजूला सीएसकेवर एक धक्कादायक आरोप केला जात आहे. हा आरोप अन्य कोणता नसून तर फिक्सिंगचा आहे.

वाचा- मुंबई इंडियन्स घेणार मोठा निर्णय; या खेळाडूंना मिळणार डच्चू!

आयपीएलमध्ये याआधी फिक्सिंगमुळे चेन्नई सुपर किंग्जवर दोन वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे आज पुन्हा असे आरोप करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. चेन्नईच्या विजयानंतर fixerkingsचा ट्रेंड सुरू झाला.

वाचा- धोनीच्या ६ चेंडूत १८ धावा: विराट म्हणाला, किंग इज बॅक; ओम फिनिशाय नम:

असे काय झाले की फिक्सिंगचा आरोप होतोय

दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी सुरू असताना चेन्नईकडून शार्दूर ठाकूरने १६वे षटक टाकले. या षटकात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत स्ट्राईकवर असताना अंपायरने सहावा चेंडू वाइड दिला. शार्दूलचा चेंडू ऑफ साईटला बाहेर होता त्यामुळे अंपायरने तो वाइड दिला. या निर्णयावर शार्दूल नाराज झाला. तर षटक संपल्यानंतर धोनी अंपायरकडे गेला आणि त्याने जाब विचारला. या घटनेवरून सोशल मीडियावर संबंधित ट्रेंड सुरू झाला.

वाचा- आले शंभर, गेले शंभर; चेन्नई सुपर किंग्ज एक नंबर; असे कमबॅक कोणालाच जमले नाही

वाचा- BCCIने टी-२० वर्ल्डकप संघात बदल केला का? जाणून घ्या मोठी अपडेट

वाचा- टॉस जिंकला आणि तेथेच धोनीने फायनलचे तिकिट मिळवले? जाणून घ्या गणित

याआधी गेल्या हंगामात अशाच प्रकारे धोनी भडकल्याचे पाहून अंपायरने वाइडचा निर्णय देण्याचे टाळले. काही चाहत्यांनी या घटनेवर मिम्स देखील तयार केले आहेत. दिल्लीविरुद्ध झालेल्या पहिल्या क्वॉलिफायर सामन्यात चेन्नईने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पृथ्वी शॉ आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी अर्धशतकी खेळी केली आणि संगाला १७२ पर्यंत मजल मारून दिली. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी १७३ धावांची गरज असताना चेन्नईला पहिल्याच षटकात धक्का बसला. सलामीवीर फाफ डुप्लेसिस बोल्ड झाला. त्यानंंतर ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा यांनी ११० धावांची भागिदारी केली. उथप्पा ६३ वर तर ऋतुराज ७० धावांवर बाद झाले. धोनीने अखरेच्या षटकात सलग ३ चौकार मारून विजय साकारला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: