शिंदे गटाच्या नेत्यामुळं आमदार राजेंद्र राऊतांच्या अडचणीत वाढ, एसीबी मालमत्तेची चौकशी करणार


सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकनाथ शिंदे समर्थक बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी तीन महिन्यात पूर्ण करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत. भाऊसाहेब आंधळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मोठ्या प्रमाणात अपसंपदा जमा केली आहे त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली होती. मार्च २०२१ मध्ये दाखल झालेल्या तक्रारीची कोणतीही दखल न घेतल्याने उच्च न्यायलयात धाव घेतल्याचं सांगितलं. उच्च न्यायलयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सोलापूरमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांची आणि त्यांच्याकडे किती केसेस पेंडिंग आहेत यासंदर्भात माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोलापुरात असलेल्या अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या जवळ असलेल्या पेंडिंग केसेसची माहिती सादर केली होती. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून आमदार राजेंद्र राऊत यांच्या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी तीन महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आंधळकर यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे द्विसदस्यीय खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि आर. एन. लड्डा यांनी हे आदेश दिले आहेत.

भाऊसाहेब आंधळंकर यांनी भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात ईडी,आयकर विभाग,अँटी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती. बार्शी येथील आमदार राजेंद्र राऊत यांनी व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी बेकायदेशीर मार्गाने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता मिळवली आहे, असा आरोप आंधळकर यांनी केला होता. राऊत यांची मालमता ज्ञात स्त्रोतांपेक्षा जास्त आहे. तसेच त्यांनी विधानसभा निवडणुकीत अर्ज भरताना सादर केलेल्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार भाऊसाहेब आंधळकर यांनी १४ मार्च २०२१ रोजी केली होती. “माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन १४ मार्च २०२१ रोजी जवळपास १७ यंत्रणांकडे तक्रार केली होती, अशी माहिती आंधळकर यांनी दिली. ईडी, आयकर विभाग आणि लाचलुचपत विभागाकडे देखील तक्रार दिली होती. त्यासाठी विवरणाची प्रतिज्ञापत्रे, मालमत्तेचे उतारे, वाहने यांची छायाचित्रे सादर करून वाढलेल्या स्थावर जंगम मालमत्तेचा तक्ता देखील सादर केला होता, असं आंधळकर म्हणाले.

सोयाबीनच्या दरात घसरण पण शेतकऱ्यांना रेशीम शेतीनं तारलं, रेशीम कोष विक्रीतून चांगले पैसे

तीन महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

ईडी,आयकर विभाग व अँटी करप्शन या विभागाकडून कार्यवाही होण्यास विलंब होत असल्याने भाऊसाहेब आंधळंकर यांनी उच्च न्यायलयात धाव घेतली होती. उच्च न्यायलयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यवाहीवर नाराजी व्यक्त करत तीन महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे.” अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी दिली.

गुजरातचे श्रीमंत कुत्रे, कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक; पाहा कसे झाले कोट्यधीश…

आमदार राऊत यांच्या कडे उपलब्ध असलेल्या ज्ञात स्त्रोतापेक्षा ७०० कोटी पेक्षा जास्त बेहिशोबी मालमत्तेची लाचलूचपत विभागाने सुरू केलेली चौकशी ही न्यायालयाने हस्तक्षेप केल्याने सुरू झाली आहे. मागील सन १९९५ ते २०२३ या कालावधीत आमदार राजेंद्र राऊत यांची स्थावर जंगम मालमत्ता कोणत्या उत्पन्नातून वाढली? त्या सर्व स्थावर मालमत्तेचे खरेदी दस्त , पोकळ दस्त, विक्री दस्त यांचे झालेले प्रत्यक्ष व्यवहार आणि रेडी रेकनर प्रमाणे झालेले व्यवहार यातील तफावत निदर्शनांस आणून दिली, असं आंधळकर म्हणाले. राजेंद्र राऊत यांच्या संदर्भातील चौकशीसाठी काही माहिती असेल तर पुराव्यासह लाचलुचपत विभाग यांच्याकडे थेट अथवा माझ्याकडे पुरावे द्यावेत आणि भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्याच्या लढ्यात सहभागी व्हावे, असं आवाहन भाऊसाहेब आंधळकर यांनी केलं आहे.

तांबे नको म्हणत असताना भाजप पाठिंब्याच्या तयारीत, कोण कोणाला अडचणीत आणतंय? 97403360Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: