गुजरातचे श्रीमंत कुत्रे, कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक; पाहा कसे झाले कोट्यधीश…


गांधीनगर: जगात अनेकांना प्राणी पाळायला आवडतात आणि यामध्ये कुत्र्यांचा क्रमांक पहिला लागतो. बहुतेकांना कुत्रे पाळायला आवडतात. काहीच दिवसांपूर्वी Netflix ने जाहीर केले की ते जगातील सर्वात श्रीमंत कुत्र्यावर एक माहितीपट तयार करणार आहेत. तर जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा हा जर्मनीचा आहे जो जर्मन शेफर्ड जातीचा आहे. या कुत्र्याची संपत्ती तब्बल ४१०० कोटी रुपये असल्याची माहिती आहे, अशी एक बातमी सोशल मीडियावर फिरत होती. एवढी संपत्ती तुमच्या आवडत्या कलाकार किंवा खेळाडूकडेही नसेल.

हेही वाचा –जेली चॉकलेट बाळाच्या घशात अडकलं, आईनं प्रयत्नांची शर्थ केली, पण जे व्हायला नको तेच घडलं

सोशल मीडियावर तुफान वेगाने शेअर होणाऱ्या जर्मनीच्या अब्जाधीश कुत्र्याची बातमी पूर्णपणे खोटी होती. पण, भारतातील या राज्यातील कुत्रे खरेच करोडपती आहेत. आम्ही तुम्हाला अशाच काही कुत्र्यांबद्दल सांगणार आहोत जे प्रत्यक्षात करोडपती आहेत. हे कुत्रे परदेशातील नसून आपल्याच देशातील आहेत, ज्यांच्या नावावर करोडोंची संपत्ती आहे. गुजरातमधील बनासकांठा येथील पालनपूर तालुक्यात दिसणारे कुत्रे इतके श्रीमंत आहेत की ज्याचा तुम्ही विचारही करणार नाही.

हेही वाचा –स्वप्नं तशीच राहिली; चार महिन्यांपूर्वीच पोस्ट ऑफीसमध्ये नियुक्ती, प्रशिक्षणाला जाताना घात…

हे कुत्रे १-२ नाही तर तब्बल ५ कोटी रुपयांचे मालक आहेत. हे वाचून तुम्हालाही धक्का बसला असेल. या कुत्र्यांकडे इतकी श्रीमंती कशी आली हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा राजेशाही होती तेव्हा बनासकांठा येथे नवाबांची सत्ता असायची. मात्र, एकेकाळी गावातील नवाबाने गावकऱ्यांना काही जमीन दिली होती आणि गावकऱ्यांनी ही जमीन या कुत्र्यांना जमीन दिली होती. सध्या येथील कुत्र्यांकडे २० बीघा म्हणजेच ६.६११६ एकर जमीन आहे. आजच्या काळात या जमिनींची किंमत ५ कोटींहून अधिक आहे.

हेही वाचा –अंत्यसंस्कारावेळी अचानक मृत्यू झालेली व्यक्ती जिवंत झाली, कसा घडला हा चमत्कार?Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: