IND vs NZ 1st T20:पराभवाला कोण जबाबदार? हार्दिकने नाव घेतले नाही, पण व्यक्ती सर्वांना कळाली


रांची: न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा २१ धावांनी पराभव झाला. प्रथम फलंदाजीकरताना न्यूझीलंडने १७६ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल टीम इंडियाला १५५ धावा करता आल्या. याविजयामुळे न्यूझीलंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

खराब गोलंदाजी आणि आघाडीच्या फलंदाजांचे अपयश हे भारताच्या पराभवाचे कारण ठरले. सामना झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने याबद्दल त्याचे मत स्पष्टपणे सांगितले. मला अंदाज नव्हता की या पिचवर चेंडू इतका टर्न होईल. आम्ही कोणीच विचार केला नाही की अशी विकेट असेल. पिच पाहून दोन्ही संघांना अश्चर्य वाटले. न्यूझीलंडच्या संघाने आज छान खेळला. नवा चेंडू जुन्या चेंडूपेक्षा अधिक वळत होता. ज्यापद्धतीने चेंडू वळत होता आणि उसळी घेत होता. त्याने हैराण झालो. मी आणि सूर्यकुमार फलंदाजी करत होतो तेव्हा वाटले की आम्ही विजयाचे लक्ष्य गाठू. अखेरच्या षटकात आम्ही २५ हून अधिक धावा दिल्या. हा एक युवा खेळाडूंचा संघ आहे आणि अशा गोष्टीतून आम्ही शिकू.

वाचा- सूर्यकुमार यादवच्या एका चुकीचा भारतीय संघाला बसला सर्वात मोठा फटका, पाहा नेमकं काय घडलं…

भारतीय गोलंदाजीत २०व्या षटकात अर्शदीप सिंगने २७ धावा दिल्या. १९ षटकापर्यंत न्यूझीलंडने १४९ धावा केल्या होत्या. त्यानंतर अर्शदीपने २७ धावा दिल्या आणि न्यूझीलंडला १७६ पर्यंत मजल मारता आली. विशेष म्हणजे त्याआधीच्या दोन षटकात म्हणजे १८व्या आणि १९व्या षटकात भारताने प्रत्येकी २ आणि ८ धावा दिल्या होत्या. २०व्या षटकातील खराब गोलंदाजी भारताला महागात पडली आणि कर्णधार पंड्याने देखील याच गोष्टीकडे लक्ष वेधले. २०वे षटक हे भारतीय गोलंदाजीच्या डावातील सर्वात महाग षटक ठरले.

भारतात टी-२० क्रिकेटमध्ये २०० पेक्षा कमी धावांचे टार्गेट असताना भारताचा न्यूझीलंडकडून झालेला हा चौथा पराभव आहे. दोन्ही संघातील मालिकेतील दुसरी लढत उद्या २९ जानेवारी रोजी लखनौ येथे होणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: