महिला पर्यटकांना घेऊन परतणाऱ्या बसच्या ड्रायव्हरला अचानक फिट आली आणि…


म. टा. प्रतिनिधी, येरवडा

वाघोलीतील महिला पर्यटन करून परतत असताना अचानक बस चालकाला फिट आली. त्यामुळे बसमधील महिला घाबरल्या; पण योगिता सातव या महिलेने तातडीने प्रसंगावधान राखून ‘स्टिअरिंग’चा ताबा घेऊन बस रुग्णालयात नेली. बसचालकाला वेळेत रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल तर केलेच; शिवाय अपघात होण्यापासून सर्वांना वाचविले. सातव यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वाचा: राज्यातील ९० टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे?; सरकारने दिले ‘हे’ महत्त्वाचे निर्देश

वाघोली येथील महिलांचा एक ग्रुप मिनी बसने बुधवारी मोराची चिंचोली येथे पर्यटनासाठी गेला होता. सायंकाळी माघारी घरी परततताना अचानक बस चालकाच्या डोळ्यांसमोर अंधार दिसू लागल्याने तो बस रस्त्याच्या कडेला घेऊ लागला. काही क्षणांतच चालकाला फिट आली आणि तो खाली पडला. या प्रकारामुळे बसमधील सर्व महिला घाबरून गेल्या; पण योगिता सातव या महिलेने तातडीने चालू बसचा ताबा घेऊन बस चालवत थेट रुग्णालयात नेली. त्यानंतर चालकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नंतर महिलांना इच्छित स्थळी पोहोचविले. बस चालवितानाचा त्यांच्या व्हिडिओ सोशल मीडियावर झळकल्याने नागरिकांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. अचानक उद्भवलेल्या प्रसंगाला धाडसाने सामोरे गेल्याने सहकारी महिला व चालकाने सातव यांचे आभार मानले. त्यांचा सत्कारही करण्यात आला.

वाचा: ‘या’ लोकांना करोना गाठणारच… इंदुरीकर महाराज नव्या वादात

आम्ही २२ महिला आणि त्यांची मुले मोराची चिंचोली फिरून घरी माघारी येत असताना बसचालकाला फिट आल्याने त्याने रस्त्याच्या मध्येच बस उभी केली. यामुळे महिला घाबरून गेल्या. मला कार चालविता येत असल्याने बस चालविण्याचे धाडस केले. चालकाला शिक्रापूरमध्ये रुग्णालयात दाखल केल्यावर सर्व महिलांना बसने सुखरूप घरी पोहोचवले. हा प्रसंग माझ्यासाठी थरारक होता. – योगिता सातवSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *