चंद्रपूर-नागपूर मार्गावर भीषण अपघात; दोन ठार, १७ जखमी


हायलाइट्स:

  • चंद्रपूर- नागपूर मार्गावर भीषण अपघात
  • या अपघातात दोन जणांचा मृत्यू
  • बसमधील १७ प्रवाशी जखमी

चंद्रपूरः वरोरा शहरातील रत्नमाला चौकात चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. तर १५ ते १७ जण जखमी झाले आहेत.

खासगी ट्रॅव्हल बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला आहे. जखमींना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मृतकांची नावे अद्याप कळू शकली नाही.

वाचाः २ लाखांचे बक्षीस असणाऱ्या जहाल नक्षलवाद्याला अटक; १६ गुन्हे होते दाखल

प्राप्त माहितीनुसार, नागपूरयेथून चंद्रपूरकडे निघालेली खासगी बस डिव्हायडर तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आली. त्याच वेळी चंद्रपूरकडून नागपूरला जाणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. या धडकेत बस आणि ट्रकच्या ड्राइव्हरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बस मधील जवळपास १५ ते १७ प्रवाशी जखमी झालेत. जखमींना बस मधून काढून वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यास आले आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

वाचाः राजकीय आखाड्यात नात्यांची परीक्षा; एकाच प्रभागात सख्ख्या जावा आमनेसामनेSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *