… अन्यथा आगामी निवडणुका स्वबळावर लढवू; घटक पक्षाचा महाविकास आघाडीला थेट इशारा


औरंगाबादः राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षात बेबनाव असल्याचे आरोप अनेकदा विरोधकांकडून करण्यात आला आहे. मात्र आता ठाकरे सरकारवर घटक पक्षाकडून सुद्धा सन्मान दिला जात नसल्याचा आरोप होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी निवडणूका स्वबळावर लढवण्याचा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी आज औरंगाबादमध्ये दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्ताने कवाडे आज ( शुक्रवारी ) औरंगाबादमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवरील नाराजी बोलून दाखवली. यावेळी बोलतांना कवाडे म्हणाले की, महाविकास आघाडीचा घटकपक्ष असूनही आम्हाला सन्मान मिळत नाही. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवू किंवा भाजप-शिवसेनेने सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास त्यांच्यासोबत निवडणूक लढवू असा इशारा कवाडे यांनी दिला आहे.

वाचाः चंद्रपूर-नागपूर मार्गावर भीषण अपघात; दोन ठार, १७ जखमी

पुढे बोलताना कवाडे म्हणाले की, सध्या देशातील आणि राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झालं आहे. त्यामध्ये आमच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीने महाविकास आघाडीच सरकार स्थापन करण्यासाठी मोलाच सहकार्य केलं. मात्र सत्तेवर आल्यावर आमच्या पक्षाला सत्तेचा वाटा मिळाला नाही, याचं खेद वाटते. त्यामुळे आता कोणावर विसंबून न राहता पीपल्स रिपब्लिकन पार्टीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचे ठरवलं असल्याचं कवाडे म्हणाले.

वाचाः पोलीस भरती प्रक्रियेला लागली कीड; परीक्षेसाठी डमी उमेदवार बसवला अन्…

तर विचार करू…

यावेळी बोलताना कवाडे म्हणाले की, आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याच जरी निर्णय आम्ही घेतला असला, तरीही इतर कोणत्या पक्षाकडून आघाडी करण्याचा सन्मानजनक प्रस्ताव जर आला तर त्याचाही आमचा पक्ष विचार करेल. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत आम्ही होतोच पण ते काही गंभीर दिसत नाही. त्यामुळे आम्ही आघाडी करण्यासाठी नवीन मित्र शोधत आहोत. तसेच जर शिवसेनचा प्रस्ताव आला तर त्याचा विचार करू, असेही कवाडे यावेळी म्हणाले.

वाचाः बँक लुटण्याचा प्रयत्न फसला; संतापलेल्या दरोडेखोरांनी केला भयंकर प्रकारSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *