पोलीस भरती प्रक्रियेला लागली कीड; परीक्षेसाठी डमी उमेदवार बसवला अन्…


म. टा. प्रतिनिधी, नागपूरः शहर पोलिस दलाच्या भरतीत मूळ उमेदवारांऐवजी अन्य युवकांनी परीक्षा दिल्याचा धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार अलीकडेच उघडकीस आला. ‘डमी कॅन्डिडेट’ची ही कीड शहर पोलिस दलापुरतीच मर्यादित नाही तर ती राज्य राखीव पोलिस दलाच्या परीक्षेलाही लागल्याचे समोर आले आहे. गेल्या महिन्यात शहरात झालेल्या एसआरपीएफच्या परीक्षेतही असाच प्रकार घडला. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी नागपूर शहर पोलिस भरती प्रक्रियेतील घोळ समोर आला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे दाखल करून जयपाल कंकरवाल, अर्जुन सुलाने आणि तेजस जाधव (तिघेही रा. औरंगाबाद) या तिघांना अटकही केली. या घोळामुळे राज्यात झालेल्या विविध भरती प्रक्रियेतसुद्धा असेच प्रकार घडले असावेत, असा संशय पोलिसांना आला. गेल्या काही काळात राज्यभरात झालेल्या विविध भरती प्रक्रियेचे ‘स्कॅनिंग’ सुरू असल्याची माहिती काही विश्वयनीय सूत्रांमार्फत प्राप्त झाली.

वाचाः बँक लुटण्याचा प्रयत्न फसला; संतापलेल्या दरोडेखोरांनी केला भयंकर प्रकार

चाचपणी केली असता, राज्य राखीव पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेतही घोळ झाल्याचे समोर आले आहे. हा घोळ राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर झाल्याचे कळते. १२ डिसेंबर २०२१ रोजी शहरातील काही केंद्रांवर एसआरपीएफ ग्रुप क्रमांक सातच्या भरतीसाठीची लेखी परीक्षा झाली. यात शहरातील दोन केंद्रांवरही हा ‘डमी कॅन्डिडेट’चा प्रकार घडला. नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गौतमनगर परिसरातील शेठ केसरीमल पोरवाल कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड कॉमर्स या परीक्षा केंद्रावर शंकर गणपत आदमने (वय २३, रा. डावरगाव, ता. बदनापूर, जि. जालना) याच्या जागी एक अज्ञात आरोपी परीक्षा देत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून पुढे आले आहे. तसेच एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रियदर्शिनी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथील परीक्षा केंद्रावरसुद्धा ऋषिकेश गजानन वसू (वय २१, रा. हिरानगर, खामगाव, जि. बुलडाणा) आणि समाधान दामू सोनुने (वय २३, रा. भोकरदन, जि. जालना) या दोघांच्या जागी दोन अज्ञात आरोपींनी परीक्षा दिल्याचे समोर आले आहे.

वाचाः भयंकर अपघात; विद्युत खांबावर चढलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू, खांबावरच लटकत होता मृतदेह

गुन्हे नागपूर पोलिसांकडे वर्ग

पुणे जिल्ह्यातील दौंड पोलिसांनी केलेल्या तपासात हे सत्य समोर आले आहे. पोलिसांनी शंकर आदमने, ऋषिकेश वसू, समाधान सोनुने या तिघांनाही अटक केली. सुरुवातीला याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात झिरोच्या कारवाईअंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले. प्रकार नागपुरात घडल्याने आता हे दोन्ही गुन्हे नागपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेत.

वाचाः चंद्रपूर-नागपूर मार्गावर भीषण अपघात; दोन ठार, १७ जखमीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *