२ लाखांचे बक्षीस असणाऱ्या जहाल नक्षलवाद्याला अटक; १६ गुन्हे होते दाखल


हायलाइट्स:

  • जहाल नक्षलवादीला अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश
  • शासनाने जाहीर केले होते दोन लाख रूपयांचे बक्षीस
  • गडचिरोली पोलिस दल व सीआरपीएफ यांची संयुक्त कारवाई

गडचिरोली: पोलीस उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोमके गट्टा (जां.) हद्दीत दि. १४/०१/२०२२ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गट्टा (जां.) जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली, पोस्टे पार्टी गट्टा (जां.) व सीआरपीएफ १९१ बटालियनची ई कंपनीचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश मिळाले आहे.

नक्षलीदृष्टया अतिसंवेदनशिल मौजा गोरगुट्टा येथील रहिवासी असलेला करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे वय ३० वर्षे पोमके गट्टा (जांबिया) ता. एटापल्ली जि. गडचिरोली हा प्लाटुन क्र.१४ च्या सशस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता. तसेच तो गट्टा दलम सदस्य व नक्षलच्या अक्शन टीमचा सदस्य होता. सन २००८ रोजी पोस्टे भामरागड हद्दीत झालेल्या दोबुर जंगल परिसर चकमक व राजु धुर्वा याच्या खुनात त्याचा सहभाग होता. उपपोस्टे दामरंचा हद्दीतील मौजा कोरेपल्ली चकमक तसेच सन २०१० रोजी मिरकल फाटा चकमकीत व तोंडेर येथील रहीवासी चुक्कु याच्या खुनात सक्रीय सहभाग होता.

सन २००९ रोजी उपपोस्टे राजाराम (खां) हद्दीतील मौजा गुड्डीगुडम येथे सागवन लाकडाने भरलेले ट्रक जाळपोळ प्रकरणात त्याचा सहभाग होता. त्याचबरोबर दि. १४/०८/२०२० रोजी पोमके कोठी येथे दुशांत नंदेश्वर या पोलीस जवानाच्या खुनात त्याचा सक्रीय सहभाग होता. तसंच, किदरटोला येथे झालेल्या रवी झुरू पुंगाटी रा. गुडंजुर, सन २०२१ मध्ये पोमके गट्टा (जां.) वर दोन वेळा झालेल्या पोस्ट अटॅक, पोमके बुर्गीवर झालेल्या पोस्ट अटॅकमध्ये तसेच सुरजागड येथे झालेल्या सोमाजी चैतु सडमेक याच्या खुनामध्ये, रोजी लग्नाकरीता पत्नीसह पुरसलगोंदी येथे गेला असतांना अशोक रामु कोरसामी रा. मंगुठा याच्या खुनामध्ये व रामा मंगु तलांडी रा. बुर्गी यांच्या खुनामध्ये त्याचा सक्रीय सहभाग होता. दि. ११/०१/२०२२ रोजी नारगुंडा परिसरात दोन वनरक्षकांना बेदम मारहाण करून त्यांचेकडील जीपीएस, हॅमर, मोबाईल, दुचाकी व इतर साहित्य पळवून नेण्याच्या गुन्ह्रात सहभागी होता. जिल्हयातील वेगवेगळया हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग आहे. त्याच्यावर खालील प्रमाणे एकुण १६ गुन्हे दाखल होते.

वाचाः बँक लुटण्याचा प्रयत्न फसला; संतापलेल्या दरोडेखोरांनी केला भयंकर प्रकार
नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर दोन लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. याव्यतिरीक्त त्याचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे. सदर अभियान पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधिक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलिस अधिक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्वात पार पडले.पोलीस अधिक्षक यांनी नक्षलवादयांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवादयांनी हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे अवाहन केले आहे.

वाचाः करोना रुग्णाची माहिती आरोग्य विभागाला मिळणार एका क्लिकवर; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

गुन्हे संख्या

खुन ०६
चकमक ०४
दरोडा ०२
जाळपोळ ०३
अपहरण ०१

वाचाः इंदुरीकर महाराज म्हणतात माळा काढणाऱ्यांसाठीच तिसरी लाट, आरोग्यमंत्र्यांनी लगावला टोलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *