शिवसेना भाजपमध्ये श्रेयवादाची ‘मेट्रो’ लढाई, दोन जेष्ठ नेते आमने-सामने


औरंगाबाद : श्रेयवादाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेना भाजप आमने-सामने आल्याचे चित्र औरंगाबादमध्ये पाहायला मिळत आहे. शहरात शेंद्रा ते वाळूज मेट्रो रेल्वेसाठी प्रस्तावित उड्डाणपुलालगतच मार्ग निर्माण करण्याच्या डीपीआरच्या हालचाली सुरू होताच, श्रेय घेण्यासाठी शिवसेना-भाजप नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेत महामेट्रो व उड्डाणपूल यांचा संयुक्त डीपीआर करण्याबाबत प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती दिली होती. मात्र मुळात मेट्रोची पहिली मागणी शिवसेनेने केली होती, असा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यामुळे मेट्रो येईल तेव्हा येईल पण शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये आत्तापासूनच श्रेययुद्ध सुरू झाले आहे.

औरंगाबादकरांनो कोरोना आता प्रत्येकाच्या घरापर्यंत आलाय; गुरुवारी तब्बल ५७३ रुग्णांची भर, तिघांचा मृत्यू
यावर बोलताना खैरे म्हणाले की, मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, ऐतिहासिक पर्यटन केंद्र असल्याने शहरात मेट्रो रेल्वेची गरज आवश्यक होती. त्यामुळे ७ फेब्रुवारी २०१८ रोजी ही मागणी मी लोकसभेत नियम ३७७ काळात केली होती. त्यानंतर तात्कालीन रेल्वे खात्याने याबाबत सर्वेक्षण करून अर्थसंकल्पात तरतूद केली होती. त्यामुळे ही शिवसेनेची मागणी असल्याचे सिद्ध होते, असे खैरे म्हणाले.

तर यावर बोलताना केंद्रीय मंत्री कराड म्हणाले की, लोकसभेत चर्चा करणे म्हणजे प्रस्ताव मंजूर झाला असे नसते. त्यासाठी तांत्रिक पाठपुरावा देखील महत्त्वाचा असतो. मेट्रोची मागणी पहिल्यांदाच समोर आली, ती गेल्या आठवड्यात. मी लोकसभेत अनेक वेगळे मुद्दे मांडले, चर्चा केली, याचा अर्थ ते प्रस्ताव मंजूर झाले आणि मीच पहिल्यांदा मांडले, असा त्याचा अर्थ होत नाही. खैरेंना या बाबी माहीत नसतील तर नाईलाज आहे, असं कराड म्हणाले.

ठाकरे सरकार, जागे व्हा, तिसरी लाट आली, नागपूर खंडपीठाने सरकारला सुनावलेSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *