कोणत्याही परिस्थितीत शाळा उघडणारच; वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याची ‘मेस्टो’ची भूमिका,


औरंगाबाद : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला आता विरोध होताना पाहायला मिळत आहे. कारण महाराष्ट्र इंग्रजी स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) संघटनेने सोमवारपासून शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. तर वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याची भूमिका सुद्धा काही संघटनांनी घेतली आहे.

कोरोनाची वाढती रुग्ण संख्या आणि ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सरकारने संपूर्ण शाळा सरसगट १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या याच निर्णयाबाबत मेस्टो संघटनेनी ११ ते १२ जानेवारीला ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोमवारपासून कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू करणार असल्याचं ठरलंय अशी माहिती मेस्टोचे संस्थापक संजय तायडे यांनी दिली आहे.

अन्यथा रस्त्यावर उतरू.…

शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस बंदच्या निर्णयास भाजपप्रणित पाच शैक्षणिक संघटना आणि असोसिएशनने रस्त्यावर उतरून आंदोलनाची तयारी दर्शविली आहे. कोचिंग क्लासेस असोसिएशन, भाजप शिक्षण संस्थाचालक आघाडी, महाराष्ट्र शिक्षक परिषद, भाजप शिक्षक आघाडी, अ.भा. शैक्षणिक महासंघाने यासंदर्भात बैठक घेतली. ज्यात शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस सुरू करण्याच्या परवानगीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यात येणार असल्याचे पदाधिकारी प्रा. पांडुरंग मांडकीकर यांनी सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *