धक्कादायक! गावातील ३ मुलांकडून नववीत शिकणाऱ्या मुलीची छेडछाड; तरुणीने….


हायलाइट्स:

  • छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
  • इंदापूर तालुक्यातील घटना
  • आरोपींविरोधात गुन्हा दाखल

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बोरी येथे नववीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गावातील तीन मुलांकडून होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमधून स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Suicide Case)

सदर मुलगी ही बोरी येथील हायस्कूलमध्ये नववी इयत्तेत शिकत होती. तिला गावातील काही मुले त्रास देत होती. याबाबत तिच्या वडिलांनी अनेकदा त्या मुलांना समजही दिली होती. परंतु तरीही सातत्याने छेडछाडीचा प्रकार सुरूच होता.

Gunaratna Sadavarte : दुकानांवर मराठी पाट्या; गुणरत्न सदावर्ते देणार ठाकरे सरकारच्या निर्णयाला ‘चॅलेंज’

बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीने घरात गळफास घेतल्याचा प्रकार उघड झाला. आत्महत्येपूर्वी तिने चिठ्ठी लिहून आईवडिलांचं नाव खराब होऊ नये, म्हणून हे पाऊल उचलत असल्याचं म्हटलं आहे. ‘आब्या’ मुळे आपण आत्महत्या करत असल्याचंही तिने चिठ्ठीत नमूद केलं आहे.

दरम्यान, मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. त्यानंतर वालचंदनगर पोलिसांनी सुसाईड नोटनुसार तिघांवर रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *