चक्क आईचेच स्मृती मंदिर उभारले; लातूरमधील तरुणाने घालून दिला नवा आदर्श


हायलाइट्स:

  • मुलाने उभारले आईचे मंदिर
  • समाजात घालून दिला नवा आदर्श
  • शिवकुमार सोनटक्के यांनी बांधले मंदिर

लातूरः मोठ्या प्रमाणात वृद्धाश्रमांची संख्या वाढताना दिसत आहे. मुलं आपल्या आई-वडीलांना वृद्धाश्रमात सोडून जातात. तर दुसरीकडे आई वडिलांची सेवा करून आधुनिक श्रावणबाळ अशी उपाधी मिळवणारी मुलं ही या जगात आहेत. असेच एक कुटूंब लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे पाहावयास मिळत आहे. आईच्या निधनानंतर आईचे मंदिर उभारून या ठिकाणी रोज पूजा अर्चना केली जाते. त्यामुळे हे मंदिर मातृ शक्ती स्थळ म्हणून लोकप्रिय झालं आहे.

आई व्यक्ती नसून ती संस्काराची खाण असते. स्वातंत्र्यसेनानी बळीराम सोनटक्के यांच्या कुटुंबात मातृशक्तीचे स्थान सर्वश्रेष्ठ असल्याचे सर्वदूर परिचित आहे. त्यांच्या कुटुंबातील काशीबाई यांना सर्व सोनटक्के कुटुंबीय देवतेसमान मानतात. त्यांच्या दातृत्वाची महती मोठी आहे. तहानलेल्यांना पाणी आणि भुकेल्यांना अन्न, मायने देने हीच काशीबाई सोनटक्के यांची संपत्ती होती, असं त्यांचे कुटुंबीय सांगतात. काशीबाई यांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन करण्यासाठी बॉल बॅडमिंटनचे राष्ट्रीय खेळाडू व पंच म्हणून नावलौकिक मिळवलेले शिवकुमार सोनटक्के यांनी चाकूर शहरात जन्मदात्या आईचे मंदिर बांधले आहे. त्यांचे मंदिर ‘मातृ शक्तिस्थळ’ म्हणून ओळखले जाते. सोनटक्के यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वाचाः माओवाद्यांची दोन वनरक्षकांना जंगलात नेत बेदम मारहाण

काशीबाई यांच्या विषयी संपूर्ण परिसर अतिशय आदराने बोलायचा. स्वातंत्र्य सैनिक असलेल्या बळीराम सोनटक्के यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांचे जीवन बदलून गेले. स्वतःच्या संसारासोबत देशाच्या संसाराची घडी बसवण्यासाठी भूमिगत असणारे कित्येक स्वातंत्र्य सैनिकांना भाजी भाकरी खाऊ घातली. अनेक गुप्त बैठकींच्या त्या साक्षीदार होत्या. दोन वर्षांपूर्वी काशीबाई यांचे निधन झाले. निधनानंतर त्यांच्या मुलांनी त्यांचे मंदिर उभारले सोनटक्के परिवारातील मुलं – मुलींनी आई वडिलांची सेवा करण्याचा आदर्श समाजासमोर घालून दिला आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वाचाः शेतात कुत्रा आला म्हणून सुरू झाला वाद; मग काय हातात कोयता, लाठ्या घेऊन…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *