शेतात कुत्रा आला म्हणून सुरू झाला वाद; मग काय हातात कोयता, लाठ्या घेऊन…


औरंगाबाद: वैजापूर तालुक्यातील माळीसागज गावात क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे यावेळी हातात थेट कोयता आणि लाठ्या घेऊन मारहाण करण्यात आल्याने एक जण जखमी झाला आहे. तर याप्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात चार लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरीनाथ गंगाधर उदावंत ( वय ८५ ) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, सायंकाळच्या सुमारास मुलासोबत घरासमोरील ओट्यावर बसले असताना, शेता शेजारील भानुदास कचरु डरे हे पंढरीनाथ यांच्या घरी आले आणि तुमचे कुत्रे माझ्या शेतात का येवू देतात असे म्हणुन शिवीगाळ करू लागले. तसेच फोन करुन स्वतःचे भाऊ भाऊसाहेब कचरु डरे, राहुल भाऊसाहेब डरे, रविंद्र भाऊसाहेब डरे यांना बोलावून घेतले. यावेळी त्यांनी पंढरीनाथ यांच्या मुलाला मारहाण सुरू केल्याने ते सोडविण्यासाठी गेल्याने राहुल भाऊसाहेब डरे याने पंढरीनाथ यांना काठीने मारहाण सुरू केली.

वाचाः अल्पवयीन मुलीचे गर्भपात प्रकरण; बायोगॅसच्या खड्ड्यात आढळले भ्रुण अवशेष व हाडे

तर रविंद्र भाऊसाहेब डरे याने घरासमोरील चारा तोडण्याचा कोयता हातात घेतल्याने पंढरीनाथ यांनी तो कोयता हातातुन हिसकावुन घेत असताना डावे हाताचे करंगळी शेजारचे बोटावर कोयत्याने जखम होवुन रक्त निघु लागले. यावेळी काही उपस्थित लोकांनी भांडण सोडवले. त्यानंतर जखमी झालेल्या पंढरीनाथ यांनी पोलीस ठाणे गाठले. मात्र त्यांना आणि त्यांच्या मुलाला मारहाण झाल्याने आणि ते जखमी असल्याने पोलिसांनी मेडीकल मेमो देवुन सरकारी दवाखाना वैजापुर येथे पाठविले. त्यानंतर उपचार सुरू असताना पंढरीनाथ यांच्या जवबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचाः शेतकऱ्यांनो! हवामानामुळे पिकांचं नुकसान होतय? मग ‘अशा’ करा उपाययोजनाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *