पुण्यात कारमधून उतरताच बाप-लेकाची हत्या; पोलीस तपासात कारण उघड!


हायलाइट्स:

  • मुलगा आणि वडिलांचा टोळक्याने केला खून
  • लोणींकद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • दुहेरी हत्येने परिसरात खळबळ

पुणे : हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या आरोपीचा व त्याच्या वडिलांचा टोळक्याने खून केल्याची घटना लोणीकंद येथे बुधवारी रात्री सातच्या सुमारास घडली. या प्रकरणी लोणींकद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Murder Case)

सनी कुमार शिंदे (वय २२) आणि कुमार मारूती शिंदे (वय ५५, दोघेही रा. शिंदे वस्ती, लोणीकंद) अशी खून झालेल्या बापलेकांची नावे आहेत. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सचिन शिंदे या तरुणाचा खून केल्याचा सनी शिंदे याच्यावर गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो तीन महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आला आहे. बुधवारी रात्री त्याच्या कारमधून तो आणि त्याचे वडील लोणीकंद येथून शिंदे वस्ती कडे निघाले होते. त्यावेळी सफारी कारमधून पाच ते सहाजण आले. त्यांनी सनी शिंदे याला अडवलं. त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार सुरू केले.

…तर पुण्यात दुकाने, हॉटेल आणि कार्यालये सीलबंद करणार; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा!

यावेळी त्याला वाचविण्यासाठी वडील कुमार शिंदे मध्ये आले. त्यावेळी टोळक्याने त्यांच्यावर देखील वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर टोळके पसार झाले आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस तपासात माहिती उघड

लोणीकंद परिसरात गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सचिन शिंदे तरुणाचा खून झाला होता. त्यामध्ये सनी शिंदे हा आरोपी होता. सचिन याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी त्याच्या मित्रांनी सनी शिंदेवर हल्ला केल्याचं तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार यांनी माहिती दिली असून आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना झाली आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *