महाविकास आघाडीत चाललंय काय?; आता काँग्रेस आमदाराने व्यक्त केली नाराजी


हायलाइट्स:

  • महाविकास आघाडीतील आणखी एका आमदाराची नाराजी
  • शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारला घरचा आहेर
  • जिल्ह्यात ठरला चर्चेचा विषय

जळगाव : राज्यातील विविध प्रश्नांवरून सत्ताधारी महाविकास आघाडीचेच आमदार राज्य सरकारविरोधात भूमिका घेऊ लागल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. एसटी संपावरून काही आमदारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. (Mahavikas Aaghadi Government)

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर नुकसानभरपाई मिळत नसल्याचं सांगत आमदार शिरीष चौधरी यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Swami Prasad Maurya: यूपीत भाजपला हादरा देणारा नेता गोत्यात!; मंत्रिपद सोडल्यानंतर २४ तासांत…

हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेच्या लाभापासून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळी उत्पादक शेतकरी वंचित आहेत. नुकसानभरपाई मंजूर होऊनही मिळत नाही, अशी खंत व्यक्त करून याबाबत महाविकास आघाडी सरकारचे नियंत्रण नसल्याचं सांगत शिरीष चौधरी यांनी शासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने सक्षम यंत्रणा उभा करावी, अशी मागणीही आमदार चौधरी यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतही आमदार शिरीष चौधरींनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर प्रचंड रोष व्यक्त केला.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदारानेच सरकारच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केल्याने जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *