भोगी-संक्रातीच्या सणाला महागाईचा चटका, वानामध्ये दिले जाणारे साहित्य महागले


हिंगोली : यंदा साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रातीच्या सणाला महागाईचा चांगलाच फटका बसतो आहे. सणाला लागणाऱ्या भाज्या आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणावर महागले आहे. वर्षाच्या सुरुवातीचा पहिला सण असलेल्या मकर संक्रातीला विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे.

यंदाची संक्रांत कोरोना आणि ओमिक्रॉनच्या सावटाखाली साजरा होत असल्याने पहिजे तसा उत्साहाच वातावरण दिसत नाहीये. हिंगोलीच्या बाजारामध्ये आज हरभरा – ३५ रुपये गड्डी, ऊसाची कांडी – ३० रुपये, ज्वारीचे कणीस – १५ रुपये नग, बोर – ११० रुपये किलो, गाजर – ७० रुपये किलो, शेंगा – ११० रुपये किलो, काळे मडके – ५० रुपयाला ५ नग, बिबा २५० रूपये प्रति किलो दराने मिळतो आहे.

संक्रातीच्या पूर्वसंध्येले एक दिवस अगोदरचे हे दर आहेत. उद्या आणखी दर वाढण्याची शक्यता आहे. इतरही साहित्य मोठ्या प्रमाणावर महागल्याचे दिसून आले. पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना जिल्ह्यात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, जिल्ह्यातील आठवडी बाजार पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा असलेले भाजीपाला सुरक्षित अंतर पाळून मोजक्या लोकांमध्ये करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आले आहेत.

यंदा होणारी मकर संक्राती कोरोनाच्या सावटाखाली साजरी होत असल्याने व्यावसायिकांमध्ये सुद्धा नाराजीचे वातावरण दिसून आले. कोरोना संबंधीचे सर्व नियम पाळून सण साजरा करण्याचे आवाहन हिंगोली जिल्हा प्रशासनाने केलें आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *